केंजळ गावच्या जमिनींच्या सात बारावरील भोगवटा दार,इनाम प्रकार काढून न टाकल्यास रास्ता रोको आंदोलन-शीतलताई गायकवाड
भुईंज :केंजळ येथील तब्बल ८० टक्के जमिनींच्या सात बारा च्या उतारावर नोंद झालेली भोगवटादार वर्ग २ ची नोंद काढून टाकावी अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा रयत शेतकरी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष शीतल ताई गायकवाड यांनी दिला.
रयत शेतकरी संघटनेच्या अध्यक्षा शीतल ताई गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांनी वाई तालुक्याचे प्रांत राजेंद्र कचरे साहेब यांची या संदर्भात भेट घेऊन केंजळ गावच्या जमिनीवरील भोगवटादार वर्ग २ हा शेर काढून टाकण्यासाठी वाई तालुक्याचे प्रांत राजेंद्र कचरे यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की मौजे केंजळ गावी सन 1985 /86 मध्ये जमीन एकत्रिकरण योजनेचे कामकाज पूर्ण झाले. गटाचे योजनेपूर्वी सुमारे 80% जमिनीस गावाचे सातबारा सत्ता प्रकार इनाम नव्हता. असे असताना गटाचे एकत्रीकरण योजनेचे रेकॉर्डला सत्ता प्रकार इनाम चुकीचा दाखल झालेला आहे. व त्यानंतर गावचे सातबारास त्यामुळे सरंजाम असा सत्ता प्रकार दाखल करण्यात आला. व त्यापुढे सध्याचे ऑनलाईन सातबारा भोगावठादार वर्ग 2 असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गावचे संबंधित शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचे रजिस्टर खरेदी विक्री गहाण तारण हक्क सोडपत्र कोणतेही दस्तावेज करता येत नाहीत. तसेच त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज शासनाच्या इतर कोणत्याही सुविधांचा लाभ घेता येत नाही. यापूर्वी काही शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे वैयक्तिक तक्रारी अर्ज देऊन त्यांचे निर्णय सातबारा दुरुस्त झालेले आहेत. काही शेतकऱ्यांची अर्ज प्रकरणी चौकशी अंतिम संबंधित खात्याकडे निर्णयावर प्रलंबित आहेत. तरी गावचे एकूण जमिनीपैकी निव्वळ इनाम असलेल्या जमिनी,नवीन शर्तीच्या जमिनी,सरकारी जमिनी,व यापूर्वी इनाम सत्ता प्रकार चुकीने दाखल झालेला आहे . त्याचे रेकॉर्ड दुरुस्त झालेल्या जमिनी वगळता शिल्लक राहिलेल्या जमिनीचे रेकॉर्ड दुरुस्त होणे बाबत. 10/10/2022 साली केंजळ ग्रामपंचायत कार्यालय ने उपअधीक्षक भूमी अभिलेख वाई यांस प्रस्तावना पाठविला होता. त्याचा पाठपुरावा कोणी करत नव्हते. तरी त्या प्रस्तावण्यास 2 महिन्याने सातारच्या ऑफिसने उत्तर दिलेले होते. शिवाय काही ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सातारच्या ऑफिसला कळवले होते. सातारच्या उपअधीक्षक भूमी अभिलेखने 8/12/2023 रोजी सदर तक्रारी अर्जाचे अवलोकन केले असता. एकत्रीकरण योजने वेळी ई सत्ता दाखल झाल्याने गट नंबरची भूधारणा पद्धती ही भोगवटादार वर्ग 2 अशी नोंद झाल्याचे नमूद केले आहे. त्याबाबत सदर अर्जाचे अनुषंगाने पडताळणी करून आपला स्वयंस्पष्ट अहवाल तीन दिवसात सादर करावा. मा.मुख्यमंत्री महोदय यांच्याकडील संदर्भ असल्याने विलंब टाळावा.असे त्या प्रस्तावण्यास उत्तर पाठवले होते. तरीसुद्धा दोन वर्षात कोणत्याही गावकऱ्यांनी पाठपुरावा केला नाही. व उपअधीक्षक भूमी अभिलेख वाई यांनी तीन दिवसानंतर न त्यांचा अहवाल सातारला कळवला नाही. परंतु, मागील महिन्यात केंजळ गावच्या सौ. शितलताई गायकवाड यांना रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष ऍड रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांनी वाई तालुका महिला अध्यक्ष ह्या पदावर नियुक्ती केली. व त्यांनी पदावर आल्यावर गावची पहिली सुरुवात भोगावटा वर्ग 2 ने केली.
शीतल ताई गायकवाड यांनी या संदर्भातीलील दुरुस्ती बाबतीत वाई तालुक्याचे प्रांत राजेंद्र कचरे यांना निवेदन दिले असून 3 दिवसात अहवाल सादर करावा अन्यथा आम्ही चक्काजाम रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.याप्रसंगी केंजळ चे माजी चेअरमन दत्तात्रेय सपकाळ, संजय जगताप शिवसेना गट प्रमुख, दत्तात्रेय जगताप, विजय जगताप, रमेश वनारसे,माणिक जगताप, विश्वनाथ गायकवाड यांच्या उपस्थित होते.