15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औत्य साधून ग्रामपंचायत शेळकेवाडीस 15 वा वित्त आयोग निधीतून ब्लूटूथ स्पीकर आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप
कराड :15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी म्हासोली या शाळेला ग्रामपंचायत शेळकेवाडी 15 वा वित्त आयोग निधीतून ब्लूटूथ स्पीकर आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सरपंच सौ.सुनंदा शेळके , दादासाहेब शेळके (फौजी),शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश चोरगे,दिगंबर चोरगे, राजाराम चोरगे, भिमराव मोहिते, राजश्री शेळके, दिपाली लावंड,सुनिता चाळके, बाळुबाई शेळके आणि ग्रामस्थ उपस्थित होते मुख्याध्यापक दिनेश थोरात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रुपाली जोगी यांनी सर्वांचे आभार मानले.