Follow us

Home » ठळक बातम्या » वाई,खंडाळा, लोणंद शहराच्या नवीन पाणी पूरवठा योजनेसाठी 166 कोटी 64 लाख आ. मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश / राज्य शासनाकडून मिळवला निधी

वाई,खंडाळा, लोणंद शहराच्या नवीन पाणी पूरवठा योजनेसाठी 166 कोटी 64 लाख आ. मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश / राज्य शासनाकडून मिळवला निधी

वाई,खंडाळा, लोणंद शहराच्या नवीन पाणी पूरवठा योजनेसाठी 166 कोटी 64 लाख आ. मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश / राज्य शासनाकडून मिळवला निधी

वाई :- वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदार संघातील वाई, खंडाळा व लोणंद या तीन शहरांसाठी शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेतून 166 कोटी 64 लाख एवढा निधी मंजूर झाला आहे. आ. मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यातुन हा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये वाई शहराच्या योजनेसाठी 62 कोटी 14 लाख, लोणंद शहरासाठी 66 कोटी 17 लाख तर खंडाळा शहरासाठी 38 कोटी 33 लाख असा भरघोस निधी मंजूर झाला असल्याचे आ.मकरंद पाटील यांनी सांगितले आहे.

आमदार मंकरद पाटील म्हणाले की, या तीन शहरातील लोकसंख्या दिवसेदिवस वाढत असल्याने तसेच नागरीकांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत होत्या तसेच शहरातील काही भागात खाजगी विहीरीव्दारे पाणीपूरवठा केल्यामुळे विज बिलाचा आर्थिक ताण या नगरपालिकांवर येत होता. तसेच भविष्यात होणारी शहरांची वाढ लक्षात घेता या नवीन पाणीपूरवठा योजना होणे गरजेचे होते.

वाई शहराची वाढती लोकसंख्या विचारत घेता तसेच खाजगी विहीरीव्दारे पाणी पुरावठा केला जात होता, ही योजना खूप जूनी असल्याने दुरूस्तीवरही खर्च होत असल्याने शहराला पाणी पूरवठा पुरेशा प्रमाणात होत नव्हता. नव्याने मंजूर झालेल्या 62 कोटी 14 लाख रुपयाच्या निधीमुळे विज बचत, देखभाल दुरस्तीच्या खर्चाची बचत होणार आहे. तसेच शहराला पाणीपूरवठा सुरळीत होणार आहे. या पाण्याचा मुख्य स्त्रोत हा धोम धरणातून होणार असून त्याचे अंतर शहरा पर्यंत 14 किमी आहे. तसेच खंडाळा शहराची पाणी पूरवठा योजना ही ग्रामपंचायत कालीन असल्याने तसेच ती पूरेशी क्षमतेची नसल्याने वाढती लोकसंख्या व वाढते औद्योगिकरण विचारात घेता पुरेसा पाणी पूरवठा करणे नगरपंचायतीस शक्य नव्हते त्यामुळे येथील नागरीकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत होते. आता खंडाळा शहरासाठी मंजूर झालेल्या 38 कोटी 33 लाख रुपये निधी मुळे नागरीकांना पुरेशा प्रमाणात पाणी पूरवठा होणार आहे. तसेच लोणंद शहरातील औद्योगिक करणामुळे व व्यापार पेठेमुळे येथील लोकसंख्येचे प्रमाण वाढत असून याठीकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील मुक्कामाचे प्रमुख ठिकाण असल्याने सध्याची पाणी पूरवठा योजना अपुरी पडत होती तसेच सदर पाणी पुरवठा योजना ग्रामंपचातीच्या काळातील असल्याने शहरासाठी पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नव्हता. त्यामुळे आता या योजनेसाठी 66 कोटी 17 लाख मंजूर झाले असल्याने येथील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

या मंजूर योजनेसाठी आमदार मकरंद पाटील यांनी शासनस्तरावर विशेष प्रयत्न केलयाने जनता त्यांना धन्यवाद देत आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket