ग्रामपंचायत जावली व पारपार चे ग्रामसेवक श्री. शंकर चिकटूळ यांचा राजर्षी शाहू आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2024 ने सन्मानीत, शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, गंजपेठ पुणे, येथे दक्ष मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित आदर्श सरपंच व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळ्यात मा. रुपालीताई चाकणकर, राज्य महिला आयोग अध्यक्ष, राज्य मंत्री दर्जा, यांचे हस्ते प्रदान करण्यात आला, गेल्या 17 ते 18 वर्षातील ग्रामपंचायत मध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन व कारकीर्द मध्ये ग्रामपंचायती ISO, वृक्ष लागवड, स्वछता अभियान,स्मार्ट ग्राम, निर्मल ग्राम, दिन दयाळ पंचायत शशक्तीकरणं अभियान, कर वसुलीत अग्रेसर, ऑनलाईन कामकाज, अशा सर्वच कामांची दखल घेऊन तसेच यापूर्वी देखील जिल्हा परिषद व राज्य शासनाने केलेला गौरव यां असलेल्या जमेच्या बाजू आणि कामात असलेलं सातत्य यां सर्वच बाबी पहाता झालेली निवड सार्थ असलेचे पत्रकार संघांचे अध्यक्ष तथा राजर्षी शाहू प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. श्री. भगवान श्रीमंदीलकर यांनी व्यक्त केले,
यां पुरस्कार मुळे माझ्यावर अधिकची जबाबदारी वाढल्याचे मत ग्रामसेवक श्री. शंकर चिकटूळ यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी लिज्जत पापड कंपनीचे सल्लागार सुरेशनाना कोते, दक्ष मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा राजर्षी शाहू प्रतिष्ठान चे अध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर, कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सतिश दरेकर, गुरव समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव गुरव, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष संतोष पाषाणकर उपस्थित होते.