Follow us

Home » राज्य » शिक्षण » यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये फार्म.डी. या व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश प्रारंभ

यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये फार्म.डी. या व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश प्रारंभ

यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये फार्म.डी. या व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश प्रारंभ

जगभरातून लक्षणीय मागणी असणारा अभ्यासक्रम साताऱ्यात करता येणार

यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या, फार्मसी महाविद्यालयात जगभरातून सर्वाधिक मागणी असणारा, औषध निर्माण शास्त्र आणि आरोग्य सेवेसाठी वेगळी ओळख असणारा फार्म.डी. अभ्यासक्रम आता यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे .

डॉक्टर ऑफ फार्मसी पदवीधारक, औषध व्यवस्थापन आणि क्लिनिकल सराव मध्ये विस्तृत ज्ञान आणि कौशल्यांसह सुसज्ज बनतात. औषधांचा सुरक्षित आणि परिणामकारक वापर सुनिश्चित करून फार्मासिस्ट हेल्थकेअर टीममध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, ज्याचा थेट परिणाम रुग्णाच्या परिणामांवर होतो.

औषधोपचाराच्या चुका टाळण्यासाठी, जुनाट आजारांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि फार्माको थेरपीला अनुकूल करण्यासाठी फार्म डी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी आवश्यक आहेत. ते औषधोपचार व्यवस्थापन सेवा प्रदान करतात, ज्यामध्ये रुग्णांच्या औषधोपचारांचे पुनरावलोकन करणे, संभाव्य औषध परस्परसंवाद ओळखणे आणि परिणामकारकता आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी समायोजनाची शिफारस करणे या गोष्टींचा समावेश होतो.

औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा पात्र झालेले विद्यार्थी, तसेच NEET परीक्षा उत्तीर्ण असणारे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून योजनांची आखणी केली जाते, नवनवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने उपक्रमशील शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांच्या मधील दूरी कमी करण्याबरोबरच व्यावसायिक शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कलागुणांना आणि व्यक्तिमत्व विकासाला प्रथम प्राधान्य दिले जाते. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल मार्फत पुरवले जाणारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नोकरीची दिशा स्पष्ट करण्यासाठी बहुमूल्य ठरते.

यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये औषध निर्माण शास्त्र या विद्याशाखेत डिप्लोमा इन फार्मसी, बॅचलर ऑफ फार्मसी, मास्टर ऑफ फार्मसी या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील अभ्यासक्रम या आधीपासूनच उपलब्ध आहेत. आता फार्म. डी या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना औषध निर्माण शास्त्र सोबतच वैद्यकीय सेवेसाठी आवश्यक असणारा कोर्स करता येणार आहे.

 सदरच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारे पात्रतेचे निकष, कागदपत्रांची आवश्यकता, प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम पूर्ततेनंतर उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या संधी या संदर्भात योग्य ती माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये भेट द्यावी असे आवाहन यशोदा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेककुमार रेदासनी यांनी केले आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket