Follow us

Home » राज्य » शिक्षण » यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात

यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात

यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात

 महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे अधिकृत सुविधा केंद्र यशोदा मध्ये सुरू

यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसोबत तंत्रशिक्षणातील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, महाराष्ट्र राज्य शासनाचे, महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे अधिकृत सुविधा केंद्र म्हणून देखील यशोदा टेक्निकल कॅम्पसला मान्यता मिळाली असून चालू शैक्षणिक वर्षातील सर्वच अभ्यासक्रमांच्या कागदपत्र तपासणीस आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे कामकाजास सुरुवात झाली आहे.

प्रत्येक वर्षी व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशा संदर्भातील घटकांमध्ये छोट्या – मोठ्या प्रमाणावर बदल होत असतात. विद्यार्थ्यांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया विषयी पुरेशी माहिती उपलब्ध नसते. . पालकांच्या मनातील अनेक समस्या या अधिकृत सुविधा केंद्रामध्ये सोडवल्या जाऊ शकतात. सुविधा केंद्रांचा मुख्य उद्देश हा विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश प्रक्रिया विषयीचे सखोल मार्गदर्शन करणे, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये संदर्भात बिनचूक माहिती देणे, विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणी मध्ये सहकार्य करणे यासोबतच प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रवेशा संदर्भात असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे असते.

चालू शैक्षणिक वर्षात यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, फॉर्म डी., एमबीए एमसीए, बीबीए, बीसीए यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना सुविधा केंद्रांची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे यापैकी कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्याला आता यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना 100% शिक्षण शुल्क प्रतिकृतीची योजना देखील चालू वर्षी राज्य सरकारने जाहीर केली आहे. याला अनुसरून विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातील पात्रता निकषांसंदर्भातील तसेच कागदपत्र संदर्भातील अनेक शंकांचे निरसन करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती या आधीच केली होती.

विद्यार्थ्यांनी त्यांची प्रवेश प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडण्यासाठी सुविधा केंद्रांना भेट देऊन इथंबूत माहिती मिळवण्याचे आवाहन यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या वतीने करण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांच्याकडून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये संदर्भात कोणतीही चूक होऊ नये आणि राज्य शासनासह केंद्र शासनाच्या सर्व शिष्यवृत्तींचा त्याला लाभ घेता यावा यासाठी या प्रकारच्या सुविधा केंद्रांची महत्त्वाची भूमिका असते. यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील विविध अभ्यासक्रमांचे सुविधा केंद्र विद्यार्थ्यां आणि पालकांना फायदेशीर ठरतील असा विश्वास यशोदा टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. विवेक कुमार रेदासनी यांनी व्यक्त केला.

आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, फॉर्म डी., एमबीए एमसीए, बीबीए, बीसीए सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांचे मार्गदर्शन एकाच छताखाली.

राज्य शासनासह केंद्र शासनाच्या सर्व शिष्यवृत्तींचा फायदा घेण्यासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket