सीए फॅक्टरी म्हणून देशात प्रसिद्ध असणाऱ्या एकेज कॉमर्स अकॅडमी चा सीए फाउंडेशन निकालामध्ये दबदबा कायम
सातारा प्रतिनिधी : कठीण समजल्या जाणाऱ्या सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. यामध्ये सातारा शहरातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य सर्वाधिक सीए घडविणाऱ्या एकेज कॉमर्स अकॅडमीच्या मुलांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सलोनी धनावडे या विद्यार्थिनीने 332 गुण मिळवून सातारा जिल्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या एकेज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सीए फाउंडेशन परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे.47 मुले पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत. देशात इन्स्टिट्यूट चा निकाल 30 टक्के असला तरी एकेज अकॅडमी चा निकाल हा 70 टक्के आहे. अकॅडमी मधील 30 मुलांना 260 पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासात घेतलेली भरघोस मेहनत व पालकांनी ठेवलेल्या विश्वास हे ह्या यशाचे महत्त्वाचे कारण आहे. गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन एकेज कॉमर्स ॲकॅडमीचे संचालक सीए आनंद कासट यांनी केले. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कमी वयात सीए होण्याचा सन्मान आनंद कासट यांनी मिळविला आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक सीए घडविण्याचे श्रेय सीए आनंद कासट यांना जाते. कॉमर्स क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध असल्याची माहिती सीए आनंद कासट यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी, पालकांनी एकेज अकॅडमी सातारा साईरंग कॉम्प्लेक्स, न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे संपर्क साधण्याचे आवाहन संचालकानि केले आहे.