Follow us

Home » सहकार » अमृत महोत्सवी वर्षात सातारा जिल्हा बँकेला 179 कोटीचा नफा अध्यक्ष नितीन पाटील

अमृत महोत्सवी वर्षात सातारा जिल्हा बँकेला 179 कोटीचा नफा अध्यक्ष नितीन पाटील

अमृत महोत्सवी वर्षात सातारा जिल्हा बँकेला 179 कोटीचा नफा 

अध्यक्ष नितीन पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

सातारा प्रतिनिधी- सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला चालू आर्थिक वर्षात 179 कोटी रुपयांचा नफा झाला आहे यामध्ये 148 कोटी 22 लाख करोत्तर नफा झाला आहे . बँकेच्या ठेवी दहा हजार पाचशे अकरा कोटी पन्नास लाख रुपये कर्ज 7293 कोटी 35 लाख रुपये आहेत याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांनी पत्रकार परिषदेतील 

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई ,संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते इत्यादी यावेळी उपस्थित होते .

 नितीन पाटील पुढे म्हणाले बँकेच्या स्वनिधीमध्ये83 कोटी 39 लाख इतकी भरीव वाढ झाली असून बँकेचे एकूण स्वनिधी 988 कोटी 61 लाख आहेत . रिझर्व बँकेच्या सूचनेप्रमाणे सरकारी कर्ज रोखे आणि सुरक्षित गुंतवणूक ही 5169 कोटी आहे अनुत्पादक कर्ज चालू आर्थिक वर्षात 48 कोटी 23 लाख असून एकूण कर्जाशी हे प्रमाण फक्त 0.57% आहे . निव्वळ अनुत्पादक कर्ज प्रमाण गेली 17 वर्ष शून्य टक्के आहे . बँकेने विकास संस्था सभासदांना साडेपाच ते आठ टक्क्याने व्याज सवलत दिली असून पाच कोटी व्याज परतावा तरतूद केली आहे . शेतकरी उत्पादक कंपन्या प्रोत्साहन सहा लाख 18 हजार, व्यक्तिगत गोडाऊन बांधकाम व्याज प्रोत्साहन 1लाख 84 हजार, शेतकरी कॅश क्रेडिट वसुली व्याज परतावा एक कोटी अशी मदत करण्यात आली आहे 

 सोळा वर्षापासून वेळेत कर्ज फेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्यात आले आहे . बँकेच्या 963 विकास सेवा सोसायटी असून 947 पूर्णपणे नफ्यात आहेत . जिल्हा बँकेने एक मे 2022 पासून अल्पमुदत पीक कर्जाच्या व्याजदरात 0.50 ते 3% पर्यंत कपात बँकेने केली आहे . विद्यार्थ्यांना देशांतर्गत तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी रुपये 30 ते 40 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध केले आहे यशवंत किसन म्हणजे या व्यासपीठाची स्थापना करून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हक्काची व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे . बँकेच्या सर्व ठेवीदार कर्जदार खातेदारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा असेल बँकेने भरण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेतला असून दहा लाखापेक्षा जास्त ग्राहकांच्या वारसांना दोन लाखापर्यंत अपघात विमा संरक्षण मिळत आहे . बँकेने 85 कोटीच्या नफ्यापैकी राखीव निधीसाठी 21 कोटी 72 लाखाची तरतूद केली आहे शेतीपद्धतीसाठी 12 कोटी 75 लाख रुपये तब्येत केली आहे . इमारत निधीसाठी एक कोटी, गुंतवणूक चढउतार पाच कोटी ,बुडीत कर्ज निधीसाठी 21 कोटी 67 लाख टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंडासाठी साडेसात कोटी तर संपत्ती सोने भाव चढ उतार निधीकरिता 50 लाख रुपये इतकी तरतूद केली आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket