Follow us

Home » राज्य » ३१ मार्च अखेरीस प्राथमिक शिक्षक बँकेचा ढोबळ नफा रू. 7 कोटी 42 लाख तर व्यवसाय रू 1180 कोटी – चेअरमन मा.श्री.किरण यादव

३१ मार्च अखेरीस प्राथमिक शिक्षक बँकेचा ढोबळ नफा रू. 7 कोटी 42 लाख तर व्यवसाय रू 1180 कोटी – चेअरमन मा.श्री.किरण यादव

३१ मार्च अखेरीस प्राथमिक शिक्षक बँकेचा ढोबळ नफा रू. 7 कोटी 42 लाख तर व्यवसाय रू 1180 कोटी –चेअरमन मा. श्री. किरण यादव

सातारा :सातारा जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या व महाराष्ट्रातील पगारदार नोकरांच्या बँकात अग्रेसर असणा-या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने ३१ मार्च २०२४ अखेरीस रू. ११८० कोटीचा व्यवसाय केलेला असून बँकेस ढोबळ नफा रू.७ कोटी ४२ लाख झाला असलेचे बँकेचे चेअरमन श्री किरण यादव व व्हा. चेअरमन श्री शहाजी खाडे यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते मा. उदय शिंदे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते मा. संभाजीराव थोरात, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे संयुक्त चिटणीस मा दिपक भुजबळ, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते मा. बलवंत पाटील, सातारा जिल्हा प्राथमिक समितीचे नेते मा. शंकरराव देवरे, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मा. विश्वंभर रणनवरे सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मा. चंद्रकांत यादव यांचे मार्गदर्शनाखाली बँकेची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे ३१ मार्च २०२४ अखेरीचे बँकेचे भाग भांडवल ४१ कोटी, निधी ३५ कोटी, ठेवी ७०० कोटी, येणे कर्ज ४८० कोटी, गुंतवणुक २७५ कोटी व खेळते भांडवल ८१४ कोटी इतके झाले आहे.

अहवाल सालामध्ये NPA व थकबाकी वसुली बाबत संचालक मंडळापुढे फार मोठे आव्हान होते, परंतु त्या करिता चेअरमन किरण यादव यांचे नेतृत्वाखाली संचालक मंडळाने नियोजनबध्द आराखडा तयार करून तो बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे व वसुली विभागा मार्फत बँकेच्या सर्व सेवकांनी यशस्वीपणे अंमलात आणला त्यामूळे बँकेच्या NPA व थकबाकीत मोठ्या प्रमाणात वसुली करता आली म्हणून गतवर्षीपेक्षा ढोबळ नफ्यात व निव्वळ नफ्यात वाढ झालेली आहे त्या करिता सर्व संचालक मंडळ व सेवक वर्गाचे चेअरमन श्री किरण यादव व व्हा. चेअरमन श्री शहाजी खाडे यांनी अभिनंदन केले.

सन २०२४ हे वर्ष बँकेचे शताब्दी वर्ष असून सभासद परिवर्तन पॅनलच्या सर्व नेतेमंडळी यांचे मार्गदर्शनाखाली शताब्दी महोत्सवाचा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे

नियोजन केले आहे. त्याकरिता या महिन्यापासूनच कामकाजाला सुरूवात करणेत आली आहे. खातेदारांना RTGS, NEFT मोबाईल बँकिंग सेवेतील IMPS सुविधा सध्या दिली जात असून नजिकच्या कालावधीत ATM कार्ड व UPI सुविधा सुरू केली जाणार असून त्याकरीता आवश्यक सर्व कागदपत्राची पुर्तता NPCI कडे केली आहे. साधारण एक महिन्यात Google पे व Phone पे या सुविधा चालू होतील.

पुढील सन २०२४-२०२५ या वर्षामध्ये बँकेच्या NPA व थकबाकीदार सभासदांनी आपली थकबाकी लवकरात लवकर बँकेकडे भरणा करावी व आपली बैंक पगारदार नोकरांची असलेने रिझर्व्ह बँकेकडील सूचनेप्रमाणे सर्व सभासदांनी बँकेचा मासिक वसूल “शालार्थ प्रणालीद्वारे” देवून बँकेस सहकार्य करावे असे आवाहन करणेत येत आहे. बँकेच्या विविध कर्ज योजनाचा या मध्ये शैक्षणिक कर्ज ७.५०%, अल्पमुदत कर्ज नं.१ ७.६०%, घरबांधणी /घरखरेदी /प्लॉट खरेदी/ टेक ओव्हर कर्ज व वाहन तारण कर्ज ८.५०%, सभासद ओ. डी / आपत्ती निवारण व सोनेतारण कर्ज ९.००% दराने असून या एक अंकी व्याजदर असलेल्या कर्ज योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक मंडळाचे वतीने चेअरमन श्री किरण यादव व व्हा. चेअरमन श्री. शहाजी खाडे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री छगन खाडे यांनी केली आहे.

यावेळी बँकेचे संचालक ज्ञानबा ढापरे, नितीन काळे, सौ पुष्पलता बोबडे, सौ. निशा मुळीक, महेंद्र जानुगडे, विशाल कणसे, नितीन राजे, तानाजी कुंभार, विजय शिर्के, संजय संकपाळ, नितीन फरांदे, विजय ढमाळ, शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, सुरेश पवार, नवनाथ जाधव, संजीवन जगदाळे, विजय बनसोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे तसेच सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket