बाळगोपाळांनी बाप्पाच्या मूर्तीला दिला आकार हिंदवीत मूर्ती बनवण्याची कार्यशाळा; विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन
सातारा, ता. २७ ः प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा संदेश शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये पोचवण्यासाठी शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठीची कार्यशाळा हिंदवी पब्लिक स्कूलच्या वतीने नुकतीच घेण्यात आली. सेंट्रल व्हिलेज पोल्ट्री इन्स्टिट्यूट, खानापूर (कर्नाटक) यांच्या वतीने १५ दिवस ही कार्यशाळा घेण्यात आली.
हिंदवी स्कूलमध्ये सेंट्रल व्हिलेज पोल्ट्री इन्स्टिट्यूटच्या वतीने १५ दिवस रोज दोन तास कार्यशाळा, कसलाही विरंगुळा, वेगळेपण काहीच नाही. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून मातीकाम आणि मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण साईराम शेट्टी, दीपा गुरव, विठ्ठल गवी, प्रज्योत कुंभार यांनी केले. गणेशमूर्ती बनवण्यासाठी शाडू माती मिळाली नसली, तरी काहींनी साध्या मातीपासून मूर्ती व भांडी बनवण्याचा आनंद घेतला. गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा हा उपक्रम अतिशय वेगळा होता. विद्यार्थ्यांकडून मूर्ती बनवून घेण्यासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागला.
विद्यार्थ्यांना कलेचे ज्ञान मिळावे, विद्यार्थ्यांनी कला शिकावी, आत्मनिर्भर व्हावे, नदी व पाण्याचे प्रदूषण न होता पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, गणेशमूर्तीचे पावित्र्य राहावे, नागरिकांना एक कला अवगत व्हावी, या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन केले होते. गणेशोत्सवात बाजारात रासायनिक रंग, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती येतात. त्यामुळे प्रदूषण वाढते म्हणून शाडू मातीच्या मूर्ती असाव्यात, असे गुरुकुल प्रकल्पाच्या संचालिका रमणी कुलकर्णी यांनी मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्राणी, पक्षी, गणेशमूर्ती, आकर्षक भांडी या वस्तूंचेही प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यास पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.