Follow us

Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे व्याजदर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय संचालक मंडळ सभेमध्ये बँकेचे चेअरमन किरण यादव यांनी जाहीर केला.

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे व्याजदर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय संचालक मंडळ सभेमध्ये बँकेचे चेअरमन किरण यादव यांनी जाहीर केला.

शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने शिक्षक बँकेचे व्याज दर कमी – किरण यादव.

   प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे व्याजदर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय संचालक मंडळ सभेमध्ये बँकेचे चेअरमन किरण यादव यांनी जाहीर केला.

   जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शिक्षक सभासद यांची दीर्घ मुदत या कर्जाचा व्याजदर कमी करण्याची अनेक वर्षांची मागणी होती. ती मागणी लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चेअरमन यांनी दिले होते.त्याची पूर्तता म्हणून दीर्घ मुदत कर्ज नंबर २ चा व्याजदर अर्धा टक्क्याने कमी करून ११% करण्यात आला आहे. तर आकस्मित कर्ज व्याजदर ०.४०% इतका कमी करून ११.५०% करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याचा कर्जदार सभासद बंधू-भगिनींना प्रति महिना एक ते दीड हजार पर्यंत फायदा होणार आहे.

     वचनपूर्तीच्या दिशेने संचालक मंडळाचे पाऊल असल्याने सभासदांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.सदर निर्णयाची अंमलबजावणी १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होणार आहे.

बँकेच्या शताब्दी वर्षात हा ऐतिहासिक निर्णय सभासद परिवर्तन पॅनलचे प्रमुख उदय शिंदे, संभाजीराव थोरात, दीपक भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील घेण्यात आला असल्याची माहिती चेअरमन किरण यादव व्हाइस चेअरमन शहाजी खाडे यांनी दिली.

  व्याजदर कमी केल्याबद्दल बँकेचे चेअरमन किरण यादव व्हाइस चेअरमन शहाजी खाडे व संचालक मंडळाचे सभासदांमधून स्वागत व अभिनंदन होत आहे.

 यावेळी विश्वंभर रणनवरे, चंद्रकांत यादव, प्रदीप कदम, शंकरराव देवरे, विठ्ठल फडतरे, व्हाइस चेअरमन शहाजी खाडे, ज्ञानबा ढापरे,नितीन काळे, पुष्पलता बोबडे,निशा मुळीक, महेंद्र जानुगडे,विशाल कणसे, नितीन राजे, तानाजी कुंभार, विजय शिर्के, संजय संकपाळ, नितीन फरांदे, विजय ढमाळ, शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, सुरेश पवार, नवनाथ जाधव, संजीवन जगदाळे, विजय बनसोडे या संचालकासह मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कदम, विजय पवार उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जुनी पेन्शन हक्क संघटनचे नेते बिरा लोखंडे यांनी डी.सी.पी.एस. धारक सेवेतील मयत कर्जदारांच्या मदत निधीत वाढ करण्याची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण करताना डीसीपीएस धारक मयत कर्जदाराच्या वारसाला ३० लाख रुपयाची भरघोस मदत करण्याचा निर्णय संचालक मंडळ सभेमध्ये घेण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket