Follow us

Home » राज्य » शिक्षण » यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये बीबीए, बीसीए पदवी अभ्यासक्रम सुरु

यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये बीबीए, बीसीए पदवी अभ्यासक्रम सुरु

यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये बीबीए, बीसीए पदवी अभ्यासक्रम सुरु

यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये शैक्षणिक वर्ष 2024 25 पासून पदवी स्तरावरील बीबीए, बीसीए अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. वि‌द्यार्थ्यांना इयत्ता बारावी नंतर कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा हा प्रश्न नेहमी सतावत असतो. पालकांना देखील आपल्या पाल्याच्या भवितव्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. आजकाल व्यावसायिक अभ्यासक्रम अत्यंत लोकप्रिय झालेले आहेत. जागतिकीकरणाच्या युगात तंत्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. बारावी मध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना बीबीए आणि बीसीए सारख्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यात अधिक रस असतो.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार यूजीसी व एआयसीटी नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून बीबीए बीसीए या पदवी अभ्यासक्रमांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे हे अभ्यासक्रम इंजीनियरिंग पदवीप्रमाणे एआयसीटीइ च्या नियंत्रणाखाली आल्याने महाराष्ट्र शासनाने बारावी पास विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सदरच्या अभ्यासक्रमांसाठी सक्तीची केली आहे.

यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये एमबीए आणि एमसीए हे अभ्यासक्रम सन 2011 पासून सुरू करण्यात आले आहेत. एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमांना वि‌द्यार्थ्यांची असणारी पसंती, यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील उच्चतम शैक्षणिक वातावरण, अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक वर्ग, दर्जेदार शैक्षणिक संसाधने सोबतच विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मध्ये मिळणारे यश पाहता बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रम सुरु करण्याची मागणी पालकांच्याकडून करण्यात येत होती.

यालाच अनुसरून यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-.25 पासून या अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात येत आहे. सदरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असले कारणाने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

यशोदा इन्स्टिट्यूटच्या रुपाने सातारा सह परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यावसायिक आणि तंत्र शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यातच बीबीए बीसीए असे अभ्यासक्रम वि‌द्यार्थी आणि पालकांना देखील करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतात. सदरच्या अभ्यासक्रमा संदर्भात माहिती घेण्यासाठी तसेच प्रवेश परीक्षा संदर्भातील माहितीसाठी विद्यार्थ्यांनी यशोदा टेक्निकल कॅम्पस या ठिकाणी भेट देण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket