Follow us

Home » गुन्हा » भरधाव कार दुभाजकाला धडकून दोघांचा मृत्यू कास रस्त्यावरील दुर्दैवी घटना,दोघे गंभीर 

भरधाव कार दुभाजकाला धडकून दोघांचा मृत्यू कास रस्त्यावरील दुर्दैवी घटना,दोघे गंभीर 

भरधाव कार दुभाजकाला धडकून दोघांचा मृत्यू कास रस्त्यावरील दुर्दैवी घटना,दोघे गंभीर जखमी 

सातारा दिनांक 4 प्रतिनिधी: साताराहून कास कडे कारमधून फिरण्यासाठी जात असताना कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला जोरदार धडकली .यामध्ये दोन तरुण जागीच ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात सोमवारी सकाळी यवतेश्वर रस्त्यावरील कासवूड रिसॉर्ट च्या परिसरात झाला

अरहान फैजल शेख वय 16 गुरुवार पेठ सोहेल अलसारी वय18 राहणार बुधवार पेठ अशी जागीच ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की साताऱ्यातील पाच तरुण कारने कासला फिरण्यासाठी जात होते कास येथील वूड्स रिसॉर्ट जवळ हे तरुण पोचले असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले त्यामुळे कार दुभाजकाला जाऊन जोरदार धडकली .हा अपघात इतका भीषण होता गाडीतील एक तरुण उडून रस्त्यावर फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर कार मधील चौरे गंभीर जखमी झाले यातील एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला जखमी तिघांना काही नागरिकांनी तातडीने साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले

घटनास्थळाचे दृश्य थरकाप पडणारे होते एका तरूणाचे डोके डांबरी रोडवर आपटल्याने त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला रस्ता पूर्ण रक्ताने माखला होता हा अपघात अतिवेगामुळे झाला असल्याचे समोर येत आहे सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये या अपघाताची रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते

कास रस्त्यावर पेट्रोलिंग वाढवणार

कास मार्गावर सकाळी सत्वासात वाजता कार दुभाजकावर आदळून जोरदार अपघात झाला . या संदर्भात प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी यवतेश्वर घाट व परिसरात सायं 7 च्या पेट्रोलिंग वाढवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले . तसेच पर्यटनस्थळांना 28 जादा पोलीस वॉर्डन नेमण्यात येणार आहे . त्यामुळे येथील अपघात व ओपन बार प्रकरणांना आळा घालता येणार आहे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्राचार्य सुनील कुमार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

प्राचार्य सुनील कुमार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा  सातारा, दि. २० : येथील पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्राचार्य सुनील कुमार

Live Cricket