भुईंज मंगल अळी ते पोलीस स्टेशन रोड ( तळनगर ) येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून सर्वपक्षीय नारळ फोडया गॅंगचा केला जाहीर निषेध
वाई दि. 14 भुईंज हे राजकीय गाव राजकीय असून सुद्धा भुईंजच्या काही भागातील रस्त्यांचा विकास जाणून-बुजून केला जात नाही तळनगरला विकासापासून जाणून बुजून लांब ठेवले जाते आणि एक-दोन ग्रामपंचायत सदस्य महाबहादरांचे म्हणणे तर असे आहे की तुमच्या रस्त्याचा विकास केला तर तुम्ही आम्हाला मतदान करणार आहे का? गेले दहा-बारा वर्षापासून मंगलअळी ते पोलीस स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत वाईट अशी दूर अवस्था झाली आहे. येथे राहणाऱ्या ग्रामस्थांना चांगला रस्ता नसल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे . या सगळयांचा वारंवार पाठपुरावा करून सुद्धा कोणी ही याची दखल घेत नाही इलेक्शनच्या काळात राजकीय नेते मंडळी रावसाहेब यांना समोर आणून कागदी घोडे नाचवत रस्ता मंजूर केला आहे आता काम सुरु होईल असे अमिषाचे गाजर दाखवत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतात. या सगळ्याला वैतागून काल संतप्त नागरिकांनी रस्त्यामधील खड्ड्यात वृक्षारोपण करून प्रशासन, नेतेमंडळी व भुईन मधील सक्रिय नारळ फोडया गॅंग यांचा रस्त्यातील खड्ड्यात झाडे लावून आगळे वेगळे आंदोलन करून जाहीर निषेध केला व या पुढील कोणत्याही निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला आपण मतदान करणार नाही असा ठाम निर्णय तळनगर ग्रामस्थांनी घेतला आहे. तळनगर हा भुईंज गावाचा भाग नाही का? गेले कित्येक वर्षा चिखल तुडवला अजून किती वर्ष तुडवायचा असा संतप्त सवाल येथील नागरिक सुरज पोळ,उमेश भोसले विजय दगडे, महेश शिंदे, दिपक साळूंखे व यांच्या सहकाऱ्यांनी केला.