बिग बॉस रितेश देशमुख यांची सातारा येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास भेट
सातारा :बिग बॉस ऍक्टर रितेश देशमुख यांनी ऐतिहासिक वाघनख्या पाहण्यासाठी सातारा येते छत्रपती शिवाजी महाराज संग्रलयास दिली भेट.शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांची देखील पाहणी केली. सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रलायला भेट देऊन वाघ नख्यांचीही पाहणी केली . छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन शस्त्र पाहून देखील त्यांनी या संग्रहालयाचे विशेष कौतुक केले आहे.
वाघनख्यांबरोबरच सातारच्या संग्रहालयात असलेले दुर्मिळ शिवकालीन वस्तू पाहून देखील त्यांनी समाधान व्यक्त केले. संग्रहालय प्रशासनाचे त्यांनी भरभरून कौतुक केले.
या संग्रहालयात भरपूर शस्त्रास्त्रे,निरनिराळी वस्त्रे पहावयास मिळतात. संग्रहालयातील प्रत्येक वस्तु इतक्या दिवसांपासून आणि अशा प्रकारे जतन केलेली आहे कि ती प्रत्येक वस्तू छ.शिवाजी महाराज, त्यांचे उत्तराधिकारी या सर्वांचा व मराठा साम्राज्याचा इतिहास सांगतात.