Follow us

Home » राजकारण » भाजपा बहुजनांचा पक्ष नाही अशी टीका केली जाते परंतु आम्ही सर्वजण नेते हे बहुजन समाजातील शेतकरीच आहोत – श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

भाजपा बहुजनांचा पक्ष नाही अशी टीका केली जाते परंतु आम्ही सर्वजण नेते हे बहुजन समाजातील शेतकरीच आहोत – श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

कराड-उत्तर विधानसभा मतदारसंघ संवाद दौरा नागठाणे महायुती मेळावा.

सातारा :आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, भाजप विरोधी असलेले नेते धादांत खोटं बोलून लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपा बहुजनांचा पक्ष नाही अशी टीका केली जाते परंतु आम्ही सर्वजण नेते हे बहुजन समाजातील शेतकरीच आहोत. भारतीय जनता पार्टीने सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोट्यावधीचा निधी देऊन विकास कामे केली आहेत. त्यामुळे भाजपकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांनी बदलावा तो अधिक व्यापक करावा. देशात पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येणार आहेत त्यामुळे प्रवाहात राहून काम करायला हवे खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हावे.

धैर्यशील कदम म्हणाले, भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण राज्यात सत्तांतर झाल्यावर उद्धव ठाकरे सरकारने मिळालेला आरक्षण घालवलं होतं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने टिकाऊ असे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले आहे.

मनोज घोरपडे म्हणाले देशाचे भवितव्य ठरवणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने पक्षासाठी वेळ देणे गरजेचे आहे विकसित भारताचा पाया पाच वर्षात रचला जाणार आहे. येणारे काळात सगळ्यांचे सोनं होण्यासाठी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.

भाऊसाहेब महाराजांना मंत्रिमंडळातून बाहेर का ठेवलं? 

भाऊसाहेब महाराज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले असते परंतु नेत्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पुढे राज्य सरकार स्थापन झाले परंतु भाऊसाहेब महाराजांना जाणीवपूर्वक मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं गेलं. जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील त्यांना देण्यात आलं नाही असं का केलं गेलं याचे उत्तर संबंधित नेत्यांनी द्यावं, असं मत आमदार शिवेंद्रसिराजे भोसले यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मनोज घोरपडे, राष्ट्रवादी सेवादलाचे राजेंद्र लवंगारे, माजी सभापती सुनील काटकर, वसंतराव जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, अनिल साळुंखे, आनंदराव नलावडे, श्रीरंग गोरे, अजिंक्यतारा सहकारी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, लालासाहेब पवार, नंदकुमार नलावडे, शंकर साळुंखे, संजय मोहिते, रामभाऊ जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य समृद्धी जाधव, हरिभाऊ साळुंखे, माधवराव गुरव, पृथ्वीराज निकम, विश्रांतीताई साळुंखे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket