देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपची २ सप्टेंबरपासून देशव्यापी सदस्य नोंदणी सरचिटणीस विनोद तावडे यांची घोषणा
भाजपची देशव्यापी सदस्य नोंदणी मोहीम २ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेरसदस्यत्वाचे नोंदणीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते देऊन केले जाईल, अशी माहिती मंगळवारी राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपने उपलब्ध करून दिलेल्या फोन क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ देऊन वा ‘नमो ॲप’ तसेच, भाजपच्या संकेतस्थळावर सदस्यत्वाची नोंदणी करता येऊ शकेल, असे तावडे यांनी सांगितले. ही सदस्य नोंदणी मोहीम पूर्ण झाल्यानंतर संघटनात्मक अध्यक्षांची नियुक्ती केली जाईल व त्यानंतर नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची नेमणूक केली जाईल, असे तावडे यांनी सांगितले.