सर्वगुणसंपन्न विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ उज्वल:- श्रीरंग काटेकर.
गौरीशंकर इन्स्टिट्यूट लिंबमध्ये वार्षिक कला क्रीडा शिक्षण संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न.
६० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
लिंब:- ध्येयपूर्तीसाठी जीवनात सर्वगुणसंपन्न गुणांची खरी गरज आहे. जे विद्यार्थी हे गुण आत्मसात करतील त्यांचाच भविष्यकाळ हा उज्वल असणार आहे असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब ता. जि. सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये कला, क्रीडा, ज्ञान संशोधन व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश गुरव, डॉ. संतोष बेल्हेकर. प्रा. माधुरी मोहिते, प्रबंधक निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की, शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांनी स्पर्धातील आव्हाने ओळखून स्वतःला सर्वगुणसंपन्नतेचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. काळाची बदलती समीकरणे पाहता शारीरिक मानसिक तंदुरुस्ती सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. विविध स्पर्धा विशेषता: कला क्रीडा संशोधन सांस्कृतिक उपक्रमातून स्वतःला सिद्ध करावे.
प्राचार्य डॉ. योगेश गुरव म्हणाले की, शैक्षणिक प्रगती बरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तितकाच महत्त्वाचा आहे. केवळ गुणात्मक वाढ हे उद्दिष्ट विद्यार्थ्यांनी न ठेवता स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी अष्टपैलू नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घ्यावेत. प्रारंभी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर प्राचार्य डॉ. योगेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक प्रविणा कोकाटे व तृतीय वर्षात प्रथम क्रमांक प्राप्त करणारा प्रणील राऊत तर विद्यापीठ स्तरावर अविष्कार स्पर्धेत विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारा शंतनू चकोते यांना गौरवण्यात आले. सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान द्वितीय वर्ष बी फार्मसी विद्यार्थ्यांनी पटकावला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. कीर्ती माने, प्रा. शुभम चव्हाण, प्रा. प्राजक्ता कांबळे, प्रा. तरन्नुम नदाफ यांनी परिश्रम घेतले.
चौकट: जिद्द ठेवा यश निश्चित मिळते.
प्रतिकूलतेवर मात करण्याचे सामर्थ्य प्रबळ इच्छाशक्ती सामावले आहे. मनात जिद्द ठेवल्यास यश निश्चित मिळते. याची असंख्य उदाहरणे समाजात अनुभवता मिळतात. जीवनात यश अपयशाची पर्वा न करता स्वतःला ओळखा व जिद्दीने मार्गक्रमण करा. यश अखेर तुमचेच आहे.
प्रास्ताविक व आभार कु. नूतन गवांदे हिने केले.
विद्यापीठ स्तरावरील अविष्कार स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी शंतनू चकोतेचा सत्कार करताना श्रीरंग काटेकर, डॉ. योगेश गुरव, डॉ. संतोष बेल्हेकर, निलेश पाटील.