Follow us

Home » राज्य » शिक्षण » एकेज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश

एकेज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश

एकेज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश

सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील सीए फॅक्टरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एकेज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत भरघोस यश मिळविले. सातारा विभागात वाणिज्य शाखेमध्ये इशिता लाहोटी प्रथम क्रमांक, जुही गोखले द्वितीय क्रमांक, यश भोसले याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. जुही गोखले हीने मॅथ्स या विषयांमध्ये बोर्डामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. वाणिज्य शाखेतील निकालात एकेज अकॅडमी चा देशात दबदबा आहे.अकॅडमी मधील 32 हून अधिक विद्यार्थ्यांनी 85 टक्के, 18 विद्यार्थ्यांनी 90 टक्के गुण मिळवले आहेत. चार विद्यार्थ्यांनी अकाउंट या विषयांमध्ये शंभर पैकी 100 गुण मिळवले आहेत.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सीए आनंद कासट, सीए निशा लाहोटी -कासट यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 वाणिज्य शाखेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकेज अकॅडमी दीपस्तंभ असून अकॅडमी मधील अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी सीए म्हणून करिअर केलेले आहे.

यावेळी इशिता लाहोटी, जुही गोखले, आदिती इंगवले, ताशी बहुवा, हर्षवर्धन पंडितराव, श्रेया कावलेकर, समृद्धी नलवडे, दर्शना माने, मुग्धा जोशी, सोहम बोंद्रे, रितेश भोसले, आयेशा मुल्ला या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket