फार्मसीतील करिअरपूरक दिशा 2024कार्यशाळा गौरीशंकर मध्ये संपन्न…
शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचाविला लिंब – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील औषधनिर्माण शास्त्र शाखेतील काळानुसार बदलती समीकरणे पाहता स्पर्धात्मक युगात सक्षमपणे स्वतःला सिद्ध करण्यासाठी व्यसाईक व कौशल्य विकसित शिक्षणाबरोबरच नाविन्यपूर्ण प्रशिक्षण शैक्षणिक कार्यकाळात विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे यासाठीचे बाजारपेठेतील उपलब्ध संधी व उज्वल करिअरसाठी पूरक ठरणारे विविध कोर्सेसची माहिती व त्याबाबतचे आकलन विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावे हा दृष्टिकोन ठेवून गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयाने बौद्धिक संपदा हक्क ( आय पी आर )आणि रेग्युलेटरी अफिसर्स हा पाच दिवशीय मूल्यवर्धित प्रमाणपत्र अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते
कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ डॉ. महेश जाधव म्हणाले की मानवी जीवनाशी निगडित असणाऱ्या या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नोकरी व व्यवसायासाठी मोठी संधी आहे उज्वल करिअरच्या दृष्टीने आवश्यक असणारे ज्ञान कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे पाच दिवशीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तिमहत्व विकसित करण्यासाठी कोणकोणती गुणाची आवश्यकता आहे त्याचबरोबर स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवावा याबरोबरच मुलाखत तंत्र व पेपर प्रेझेंटेशन बाबत अचूक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली या कार्यशाळेत बी.फार्मसीच्या शंभर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजित कुलकर्णी म्हणाले की विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान त्यांच्या भविष्यातील उज्वल वाटचालीस पूरक ठरते. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव, डॉ संतोष बेल्हेकर, डॉ.भूषण पवार ,डॉ. धैर्यशील घाडगे, प्रा रोहन खुटाळे प्रा. कीर्ती माने, प्रा. गौरी इथापे, प्रा. दुधेश्वर क्षीरसागर, प्रा. रजनीकांत सावंत,प्रा, स्वप्नाली झोरे ,प्रा. शैलेजा जाधव यांनी परीश्रम घेतले.
कार्यशाळेत पुणे येथील तज्ञ डॉ. प्रवीण बुगे, सचिन गुंदेच्या ,अमित कुंभार, प्रमोद बोरकर ,केदार मोरे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु नूतन गवांदे हिने केले व आभार डॉ. धैर्यशील घाडगे यांनी मानले.
औषधनिर्मिती क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे याकरिता आवश्यक असणाऱ्या कुशल व कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्मितीसाठी महाविद्यालय स्तरावर होणाऱ्या कार्यशाळा उपयुक्त ठरतात जागतिकस्तरावर औषध उत्पादित क्षेत्रात भारत सर्वात अग्रेसर ठरला असून भारतीय उत्पादित औषधांना जगात मोठी मागणी आहे.