Follow us

Home » ठळक बातम्या » मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात खासदार शिवसेनेचाच होणार

मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात खासदार शिवसेनेचाच होणार

साताऱ्याच्या लोकसभा जागेसाठी आग्रही भूमिका घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात खासदार शिवसेनेचाच होणार, पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या या आग्रही भूमिकेला जिल्ह्यातील जनतेकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याने जिल्हा शिवसेनेत प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट वर्षा बंगल्यावर जावून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेसाठी जिल्ह्यातील सकारात्मक वातावरण आणि पदाधिकारी व शिवसैनिकांनी केलेल्या निर्धाराबाबत सविस्तर चर्चा केली. ‘अभी नही तो कभी नही’ च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आग्रही भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन करीत साताऱ्याची जागा आपण लढवू असे सांगून या जागेसाठी आपण आग्रही राहणार असल्याचे स्पष्ट केले.

याप्रसंगी बोलताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले की 2009 ची लोकसभा निवडणूक मी शिवसेना भाजप युतीचा उमेदवार म्हणून लढलो. त्यावेळी मला दोन लाख 34 हजार 56 मते पडली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवरायांचा गादीचा जिल्हा कोणतेही कारण नसताना मित्र पक्षाला सोडण्यात आला, त्यावेळी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सातारा लोकसभा निवडणूक अपक्ष लढलो. त्यावेळी मला एक लाख 56 हजार मते पडली. त्यावेळी देशात मोदी लाट होती. परंतु त्या लाटेमध्ये देखील मला भारत देशातील अपक्ष उमेदवारांमध्ये क्रमांक दोनची मते पडली आहेत. साहेब 2014 सालीच शिवसेनेचा भगवा फडकला असता, परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी मी तयारी करून देखील माझ्यावर अन्याय केला आहे. त्यानंतर 2019 च्या पंचवार्षिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपामधून नरेंद्र पाटील शिवसेनेमध्ये येऊन धनुष्यबाण या चिन्हावर लढले होते. कारण हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे म्हणून परंतु त्यावेळेच्या निवडणुका झाल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी राजीनामा देऊन भाजपवासी झाले आणि पोटनिवडणुकीला त्यांना भाजपतर्फे लढले. त्यावेळी आम्ही सर्व शिवसैनिकांनी त्यांचे काम केले आहे. आता संपूर्ण सातारा जिल्ह्यात शिवदूत आणि बूथ प्रमुखांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही हजारो कोटी रुपये निधी दिला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील वातावरण शिवसेनेसाठी लाभदायक आहे. त्यात तुम्ही सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र आहात त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्यावतीने लढल्यास उद्याचा खासदार हा शिवसेनेचाच असेल. यामुळे भविष्यातील सर्वच निवडणुकांसाठी शिवसेनेला फायदा होणार हे स्पष्ट आहे. महायुतीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्यावतीने लढवण्यात यावा याबाबत सर्वांनी आग्रही भूमिका मांडली यावर मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी सकारात्मकता दर्शवली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket