Follow us

Home » राज्य » ॲक्मा बेस्ट प्रॅक्टिसेस स्पर्धेत कूपर कॉर्पोरेशन विजेते

ॲक्मा बेस्ट प्रॅक्टिसेस स्पर्धेत कूपर कॉर्पोरेशन विजेते

ॲक्मा बेस्ट प्रॅक्टिसेस स्पर्धेत कूपर कॉर्पोरेशन विजेते

ऑटोमोबईल क्षेत्रातील नामवंत संस्था ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ACMA WR) ने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात मधील उ‌द्योगांसाठी ८वी बेस्ट प्रॅक्टिसेस स्पर्धेचे आयोजन नुकतेच द ऑर्किड हॉटेल, पुणे येथे केले होते. या स्पर्धेत नामवंत उ‌द्योग टाटा, बॉश, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, अल्मिटी, दाना इंडिया, केएसपीजी, याझाकी, बेलराइज, अॅडविक इ. उ‌द्योगांचे ७२ संघ सहभागी झाले होते. या विभागीय काईझेन स्पर्धेत कूपर कॉर्पोरेशने दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक लो कॉस्ट ऑटोमेशन (एलसीए) श्रेणीत पटकावले.

“बेस्ट प्रॅक्टिसेस” म्हणजे कार्य करण्यासाठी सर्वात प्रभावी आणि कार्यक्षम पद्धती. या पद्धती अनुभव आणि प्रयोगा‌द्वारे विकसित केल्या गेल्या आहेत आणि कार्य पूर्ण करण्यासाठी सर्वात तार्किक आणि व्यावहारिक दृष्टिकोन असल्याचे निश्चित केले गेले आहे. बेस्ट प्रॅक्टिसेसचे पालन केल्याने प्रक्रिया सुरळीत चालते आणि इच्छित परिणाम मिळतात याची खात्री करता येते.

या पार्श्वभूमीवर ACMA वेस्टर्न विभाग “बेस्ट प्रॅक्टिसेस” स्पर्धा हि दर वर्षी आयोजित करत असते, तर ह्या स्पर्धेची 8 वी आवृत्ती शुक्रवार, १५-मार्च-२४ रोजा द ऑर्किड हॉटेल, बालेवाडी, पुणे येथे आयोजित केली गेली होती. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांनी पोका-योक, कमी खर्चाचे (लो कॉस्ट) ऑटोमेशन आणि एनर्जी कॉन्झव्हेशनची अंमलबजावणी केली आहे त्यांना त्यांच्या संस्थेतील सर्वोतम पद्धतींद्वारे प्रेरित करणे हा या स्पर्धेच्या आयोजनामागचा उ‌द्देश आहे. तसेच, स्पर्धेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना या अनोख्या व्यासपीठावर त्यांच्या उत्कृष्ट पद्धती प्रदर्शित करण्याची संधी मिळेल, जिथे उ‌द्योगात लागू केलेल्या या पद्धतींमधून शिकता येते. या स्पर्धेच्या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्याम सिंग, प्लांट हेड टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड, पुणे उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके वितरण करण्यात आले.

कूपर प्लांट्समधून २ संघ सहभागी झाले होते. इंजिन प्लांट (मॅटेनन्स विभाग): वॉरियर टीम श्री जयकर गावडे आणि श्री सूरज मातकर यांनी एलसीए खर्च कमी करणे श्रेणीत प्रकल्पाचे सादरीकरण केले…. टीमला विजेते द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. आणि L3 Fdry (मेंटेनन्स विभाग): इनोवेटिव्ह टीम श्री. अतुल भोसले आणि श्री राजेंद्र जाधव यांनी ऊर्जा संवर्धन श्रेणीत प्रकल्पाचे सादरीकरण केले… टीमला सहभाग प्रमाणपत्र मिळाले.

मागील वर्षी सुद्धा ७ व्या ACMA (WR) बेस्ट प्रॅक्टिसेस स्पर्धेत कूपर कॉर्पोरेशने विजेता द्वितीय क्रमांक याच श्रेणीत पटकावला होता. कूपर कॉर्पोरेशन चे व्यवस्थापन अधिकारी श्री. नितीन देशपांडे (CHRO), श्री. अस्लम फरास (CCO), श्री. रमेश जाधव (CMO), श्री. अमित धोंडुगडे (DGM) यांनी सुद्धा वेळोवेळी संघाना मागर्दर्शन केले आहे. या पुरस्काराचा कूपर कॉर्पोरेशन व्यवस्थापनेला अभिमान आहे, असेच पुढेही कूपर कॉरिशन विविध बाहेरील स्पर्धांमध्ये भाग घेत राहील व कामगार आणि कर्मचारी यांचे मनोबल वाढवत राहील.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket