आकडीचे निदान, औषधोपचार आणि सर्जरी
अपस्मार हा एक मेंदूचा जुनाट रोग असुन आपल्याकडे तो मीरगी, फीट्स, आकडी ईत्यादी नावांनी ओळखला जातो. हा आजार जगभरात आढळुन येतो. जवळ्पास लोकसंख्येचा एक टक्का एवढे याचे प्रमाण मोठे आहे. या आजाराने ग्रस्त लोक खेळणे, पोहणे, वाहन चालवणे, रोजगार, शिक्षण, लग्न व सामाजिक प्रतिष्ठा अशा ब-याच गोष्टीपासुन वंचीत राहतात. लहान मुलांमध्ये हा प्रश्न तर आणखीनच बिकट आहे. योग्य त्या वयात आणि वेळीच अचुक निदान व उपचार झाले नाहीत तर मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही व मतीमंदता येते. या मुलांची योग्य वेळी शस्रक्रिया किंवा वैद्यकीय उपचार झाले तर ही मुले पुर्णत: सामान्य आयूष्य जगू शकतात.
एपिलेप्सी किंवा अपस्मार म्हणजे काय ?
अपस्मार या आजारामध्ये रुग्णाला अचानक आकडीचा झटका येतो आणि ब-याच वेळा शुध्द हरपून तो खाली पड़ल्यामुळे शारिरीक इजा होते. हे धोकादायक असु शकते. मेंदूमध्ये गाठी येणे, ट्युमर्स तयार होणे ही अपस्माराची प्रमुख कारणे आहेत. जन्माच्या वेळी मेंदुला झालेली इजा व जंतुसंक्रमण हे असु शकतात. काही अंशी मेंदूच्या जडणघडणीच्या सुरवातीच्या काळात झालेली गुंतागुंत देखील आढळुन येते.
प्रत्येक आकडी किंवा एखादी क्वचित प्रसंगी आलेली फीट म्हणजे अपस्मार नव्हे. परंतू अशा प्रत्येक फीट्सचे मेंदू रोग तज्ज्ञाकडून निदान करुन घेणे आवश्यक असते. अपस्माराचे निदान झाल्यानंतर प्रथम अपस्मारची प्रतीबंधक औषधे सुरु केली जातात. मात्र औषधांनी आकडी नियंत्रणात येत नसल्यास आजच्या काळामध्ये सोप्या आणि सुटसुटीत शस्त्रक्रिया करुन अपस्माराचा यशस्वी उपचार केला जाऊ शकतो.
अपस्मार औषधांनी आटोेक्यात येणार नाही हे कसे ठरवावे ?
सामान्यपणे तज्ज्ञ डॉक्टर अपस्माराचे निदान झाल्यानंतर एक औषध सुरु करुन हळूहळू औषधांचा डोस वाढवुन आकडी नियंत्रणात आणतात. औषधाचा पुर्ण डोस घेवून सुध्दा आकडी येत असेल तर आणखी दूसरे औषध सुरु केले जाते. साधारणत: १०० पैकी ५० रुग्णांची आकडी ही एका औषधातच नियंत्रणात येते. दुसरे औषध सुरु केल्यानंतर आणखी १५ लोकांना आराम मिळतो. मात्र दोन औषधांचे पूर्ण डोस व्यवस्थीत घेऊन सुध्दा आकडी येत असेल तर त्यानंतर आणखी कितीही नवीन आणि ताकदीचे औषध दिले तरी त्याचा फायदा होण्याची शक्यता नसते. अशा रुग्णांचे प्रमाण हे १०० पैकी ३५ एवढे असते. ज्यांची आकड़ी औषधाने नियंत्रणात येत नाही. याला औषधांना न जुमानणारा अपस्मार असे संबोधतात. अशा रुग्णांनी वारंवार डॉक्टर बदलून आणखी नवनवीन औषधी घेण्यापेक्षा योग्य तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन उपचार करणे संयूक्तीक ठरते. अशा अपस्माराचा अगदी सोप्या व सुटसूटीत शस्त्रक्रियाद्वारे यशस्वी उपचार शक्य आहे. कारण वेळीच उपचार केला असता आकडीपासुन पुर्ण मुक्ती मिळवणे शक्य असुन, वेळ घालवल्यास मेंदूला कायमस्वरुपी अपाय होण्याची शक्यता वाढते.
अपस्माराच्या शस्त्रक्रिया म्हणजे काय ?
सामान्यत: ज्या रुग्णांमध्ये औषधांनी अपस्मार नियंत्रणात येत नाही. त्यांच्या मेंदुमध्ये काहीतरी अपवादात्मक भाग आढळून येतो. विविध तपासण्यांद्वारे असा मेंदूचा भाग शोधुन सोप्या शस्त्रक्रियाद्रारे काढून टाकल्यास रुग्णांचा अपस्मार हा कायमचा दुरुस्त होतो व ब-याच रुग्णांना औषधे घेण्याची सुध्दा गरज उरत नाही.
अपस्माराची शस्त्रक्रिया का आवश्यक
अपस्मारची शस्त्रक्रिया ही सोपी व सुटसूटीत असते. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या जिवाला धोका होण्याची शक्यता फक्त शंभर पैकी एक किंवा दोन रुग्णांमध्ये दिसुन येते. अपस्मारामुळे दरवर्षी दगावणा-या रुग्णांची संख्या ३-४ टक्के एवढी असते; यापेक्षा शस्त्रक्रियेचा धोका हा कितीतरी कमी आहे. आकड़ी ही ब-याच वेळा अनपेक्षीत रित्या येते आणि तो एक अतीशय वाईट अनुभव असतो. यामुळे रुग्णाला आपल्या ब-याच आनंदाला मुकावे लागुन सतत कुणाच्या तरी सोबतीवर अवलंबुन रहावे लागते. समाजामध्ये सुध्दा अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन हा तितकासा चांगला नाही. अपस्मारामुळे फक्त आकडी येत नाही तर हळूहळू स्वभावामध्ये बदल होतो, मतीमंदता येते, स्मरणशक्ती कमी होते. प्रतीबंधक औषधे ही फक्त आकडी थांबवतात परंतु औषधांचे सुध्दा साईड असतात. फार काळापर्यंत ही औषधे घेतल्याने वजन वाढणे, हाड़े ठिसुळ होणे, नकारात्मक विचार निर्माण होणे अथवा जगण्याची ईच्छा नाहीशी होणे असे बरेच दुष्परिणाम दिसुन येतात. औषधे ही प्रतीबंधक असतात. त्यामुळे फक्त आकडी थांबते परंतु मेंदूला मुळ आजार तसाच रहातो. शस्त्रक्रियेद्वारे तो मुळ अपवादात्मक भाग काढ़न टाकल्यास अपस्माराचे समुळ उच्चारण शक्य होते. आर्थिक दृष्ट्या देखील शस्त्रक्रिया ही फायद्याची ठरते. आज तुम्ही दोन किंवा तीन प्रतीबंधक औषधे घेत असाल तर महिन्याचा खर्च साधारणत: ५-७ हजारापर्यंत जातो. म्हणजेच वर्षाकाठी ७० हजार रुपये लागतात. शस्त्रक्रियेसाठी सर्व तपासण्या व औषधासह जवळ्पास दोन ते अडीच लाखापर्यत खर्च अपेक्षीत असतो. म्हणजेच तुम्ही तीन वर्षाच्या औषधांच्या खर्चामध्ये जन्मभराची सुटका करुन घेऊ शकता.
अपस्माराच्या शस्त्रक्रियेची प्रक्रिया
दोन औषधांनीसुध्दा आकडी नियंत्रणात येत नाही तेव्हा त्या रुग्णांची निवड पुढील तपासण्यासाठी करण्यात येते. व्हिडीओ ईसीजी ही सर्वात महत्वाची व प्रथम पायरी आहे. कारण या तपासणीनंतर जवळ्पास एक तृतीयांश लोकांना अपस्मार नसुन दूसराच काहितरी आजार आहे असे लक्षात येते. योग्य निदान होऊन त्याची औषधापासुन मुक्तता होते. त्या नंतरच्या तपासण्यामध्ये एमआरआय, पेट स्कॅन ईत्यादींचा समावेश होतो. या सर्व तपासण्या व्हिडीओ ईसीजी नंतरच करणे आवश्यक आहेत, कारण प्रत्येक तपासणी ही विशिष्ठ भागावर लक्ष केंद्रीत करुन केली जाते. त्यामूळे व्हिडीओ ईसीजीशिवाय अपस्माराची कुठलीही शस्त्रक्रिया शक्य नाही. या सर्व तपासण्यांच्या अहवालानंतर तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम विचार विनीमय करुन त्यातुन योग्यतो निष्कर्ष काढला जातो व रुग्णाला योग्य शस्त्रक्रिया सुचविली जाते.
व्हिडीओ ईसीजी म्हणजे काय ?
व्हिडीओ ईसीजी साठी रुग्णाला साधारणत: ५-७ दिवस रुग्णालयात भरती करुन त्यांचा ईसीजी केला जातो. २४ तास त्यांचे कॅमे-यानी छायाचित्रण केले जाते . रुग्णालयात रुग्णांची औषधे बंद करुन त्यांना आकड़ी येण्यास प्रवृत्त केले जाते. अशा तहिने २४ तास डॉक्टर आणि सर्व प्रकारच्या अतीदक्षता सेवा उपलब्ध असलेल्या जागी रुग्णांच्या आकडीचे अध्ययन केले जाते. ही अतिशय सुरक्षीत तपासणी असुन यामध्ये रुग्णाच्या जीवाला कुठलाही धोका नाही. याला साधारणत: ४० हजारापर्यंत खर्च अपेक्षीत आहे.
सोप्या व सुटसुटीत शस्त्रक्रिया
या शस्त्रक्रिया अत्यंत सोप्या व सुटसुटीत आहेत. साधारणत: या ४-५ तास चालतात. ढोबळमानाने शस्त्रक्रियेनंतर १०० पैकी ८० रुग्णांची आकडी ही पुर्णत: नियंत्रणात येते व साधारणतः ६० रुग्णांना जन्मभरासाठी औषधापासुन मुक्ती मिळते. जवळपास सर्वरुग्णांची शस्त्रक्रियेनंतर औषधांची मात्रा ब-याच अंशी कमी होते व आकडीची तीव्रता कमी होते. शस्त्रक्रियेचे महत्वाचे दुष्परिणाम म्हणजे एखाद्या हाताला अथवा पायाला अधुत्व येणे, बोलण्यास त्रास होणे व अपंगत्व येणे. परंतु असे दुष्परिणाम अनपेक्षीतरित्या होण्याची शक्यता ही फक्त ५% एवढी आहे व ती मेंदुच्या दुस-या कुठल्याही शस्रक्रियेएवढीच आहे. अपस्मार हे स्वतःच एवढे मोठे अपंगत्व आहे की त्यामानाने शस्त्रक्रियेनंतर होणारे दुष्परिणाम हे अतिशय क्षुल्लक वाटतात.
समाजात अपस्मार आणि त्याची शस्त्रक्रिया याबद्दल बरेच अपसमज आहेत व दुर्दैवाने यातले बरेच गैरसमज हे डॉक्टरांमध्ये सुध्दा आढळतात. ब-याच वेळा रुग्णांना यामुळे योग्य ती मदत वेळेवर मिळत नाही व मेंदूला कायमचा अपाय होण्याची शक्यता वाढते.
सातारा हॉस्पिटल अँड सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दर शुक्रवारी उपलब्ध असणारे डॉ. सुजित जगताप हे पुण्यातील नामवंत एपिलेप्सी तज्ज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत ८०० पेक्षा जास्त आकडीवरील शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या आहेत.
गैरसमज १: प्रथम ईसीजी नॉर्मल आहे म्हणजे मेंदूमध्ये काहीही बिघाड नाही.
सत्य : ब-याच वेळा रुटीन केल्या जाणा-या ईसीजी मध्ये कुठलेही निदान होत नाही आणि व्हिडीओ ईसीजी मध्ये बिघाड आढळून येतो व यशस्वी शस्त्रक्रिया देखील होते.
गैरसमज २: एमआरआय नॉर्मल आहे त्यामुळे मेंदुमध्ये कुठलाही बिघाड नाही.
सत्य : अपस्मारामध्ये एमआरआय हा व्यवस्थीत व्हिडीओ ईसीजी नंतर अभ्यास करुन केला जातो. त्याचे तज्ज्ञ डॉक्टर वेगळे असतात. त्यामुळे रुटीन एमआरआय नॉर्मल असून सुध्दा व्हिडीओ ईसीजी नंतर केलेल्या स्पेशल एमआरआय मध्ये निष्कर्ष निघतो. काहितरी अपवादात्मक आढळुन येते व यशस्वी उपचार शक्य होतो.
गैरसमज ३: मानसिकदृष्ट्या विकलांग लोकाची अपस्माराची शस्रक्रिया केली जाऊ शकत नाही.
सत्य : अपस्माराची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर ब-याच रुग्णांमधील विकलंगता कमी झाल्याचे निष्कर्षास आले आहे. या ब-याच लहान मुलांची एकाग्रता आणि शिकण्याची समज व योग्यता वाढल्याचे निष्कर्ष जगभरात दिसलेले आहेत.
गैरसमज ४: अपस्माराची शस्त्रक्रिया कूठेही शक्य आहे.
सत्य : अपस्माराची शस्त्रक्रिया ही सर्व सोयींनी सुसज्ज अशा रुग्णालयातच होऊ शकते आणि त्याला ब-याच मशीन्स आणि टेक्नॉलॉजीची गरज भासते.