कर्तव्य करूया शहर स्वच्छ ठेवूया……
उघड्यावर कचरा नको रे बाबा, सूचनाफलका समोरच कचऱ्याची साम्राज्य
सातारा – शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी जशी नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे तितकीच जबाबदारी सुज्ञ नागरिकांची आहे सातारा नगरपालिका शहर कचरा मुक्त करण्यासाठी प्रत्येक वार्डात घंटागाडीची सोय केलेली असताना ही काही नागरिक स्वतःच्या घरातील व दुकानातील कचरा प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्यावर टाकत शहराचे विद्रुपीकरण करीत आहेत नागरिकांनी स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी खरे तर एक पाऊल पुढे टाकले पाहिजे असे असताना सोमवार पेठ (तांदुळआळी ) येथे नगरपालिका प्रशासनाने कचरा टाकू नये असाच सूचना फलक लावून ही त्याच फलकासमोर अगदी केर कचरा व प्लास्टिक पिशव्या कागदी पिशव्या टाकून नगरपालिकेचे स्वच्छता अभियानास हरताळ फासत आहेत शहर स्वच्छ ठेवणे जशी नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे तशी प्रत्येक नागरिकांची सुद्धा आहे याची जाणीव असायला हावी
नागरिकानी स्वंयशिस्तीचे पालन केल्यास आपले शहर स्वच्छ राहील घरातील अथवा दुकानातील कचरा घंटागाडी टाकून नगरपालिका प्रशासनास सहकार्य केले पाहिजे शहर स्वच्छतेतून शहराचे सौंदर्य खुलते याची भान नागरिकांनी ठेवावे निरोगी आरोग्याच्या दृष्टीने रस्त्यावर कचरा टाकू नये
श्रीरंग काटेकर सातारा