Follow us

Home » ठळक बातम्या » वकृत्व स्पर्धेतील यश उत्कर्षासाठी पूरक ठरते – डॉ अनिरुद्ध जगताप

वकृत्व स्पर्धेतील यश उत्कर्षासाठी पूरक ठरते – डॉ अनिरुद्ध जगताप

वकृत्व स्पर्धेतील यश उत्कर्षासाठी पूरक ठरते – डॉ अनिरुद्ध जगताप

गौरीशंकर देगाव फार्मसी मध्ये सोळावी राज्यस्तरावरील वकृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

देगाव – वकृत्व स्पर्धेतील यश भावी जीवनाच्या उत्कर्षासाठी पूरक ठरते असे मत गौरीशंकर चे संचालक डॉ अनिरुद्ध जगताप यांनी व्यक्त केले ते गौरीशंकरचे सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालय सातारा येथे विकसित भारत माय व्हीजन या विषयावर आधारित सोळाव्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी शासकीय औषधीनिर्माण शास्ञ महाविद्यालय कराडचे माजी प्राचार्य डॉ सतीश भिसे, सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगावचे प्राचार्य डॉ नागेश अलूरकर, डॉ अविनाश भोसले, कार्यक्रम समन्वयक डॉ सीमादेवी कदम प्रबंधक हेमंत काळे ,प्रा संध्या बुंदेल प्रा. फिरदोस शेख आदी प्रमुख उपस्थित होते .

डॉ अनिरुद्ध जगताप पुढे म्हणाले की विषयातील मांङणी व सखोलज्ञान प्रभावी सादरीकरण बरोबरच रसिकांच्या हृदयाला भिङणारे शब्द भावनांचा झालेल्या सुरेख संगमावर आधारावरच यश प्राप्त होते.

कराडचे माजी प्राचार्य डॉ सतीश भिसे म्हणाले की वकृत्व स्पर्धेतील सहभाग विद्यार्थीच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असतो स्पर्धेत मिळणारे अनुभव लाभलेले व्यासपीठ व झालेले विचारांची देवाण घेवाण आत्मविश्वास उंचविण्यासाठी कामी येतो.

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राज्यभरातील औषधी निर्माण शास्त्र शाखेतील विविध महाविद्यालयातील 60 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये कृण्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कराङची अलिना काडवेकर हिने प्रथम क्रमांक तर याच महाविघालयाची प्रणिता धनावङे हिने द्वितीय क्रमांक मिळविला तृतीय क्रमांक अपेक्षा चित्रे डॉ डी वाय पाटील फार्मसी कॉलेज पुणे या विद्यार्थिनी मिळाला तर उत्तेजनार्थ बक्षीस वैष्णवी शेंडे, वैष्णवी घाडगे यांना देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे , प्रशासकीय अधिकारी नितिन मुङलगीकर जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोफिया इनामदार व स्नेहल घोरपडे यांनी केले व आभार प्रा.संध्या बुदेंल यांनी मानले

 

विकसित भारत नाय व्हिजन या विषयावर आयोजित राज्यस्तरावरील वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रगती व विकासाच्या नव्या संकल्पनाचे सादरीकरण केले विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीला नवी दिशा देण्यासाठी राष्ट्रभक्ती राष्ट्रनिष्ठा बरोबरच कठोर परिश्रमाची खरी गरज आहे नव्या पिढीने हे गुण आत्मसात करून आत्मनिर्भर भारत घडविण्याचा ध्यास घेतला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून या वकृत्व स्पर्धेचे आयोजन गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयाने केले होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket