Follow us

Home » देश » छत्तीसगड मधील दारूगोळा कारखान्यात स्फोट; 10 हून अधिक जणांचा मृत्यू! ढिगाऱ्याखाली अनेक जण गाडले 

छत्तीसगड मधील दारूगोळा कारखान्यात स्फोट; 10 हून अधिक जणांचा मृत्यू! ढिगाऱ्याखाली अनेक जण गाडले 

छत्तीसगड मधील दारूगोळा कारखान्यात स्फोट; 10 हून अधिक जणांचा मृत्यू! ढिगाऱ्याखाली अनेक जण गाडले

छत्तीसगडमधील बेमेतरा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील गनपावडर कारखान्यात मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात 10 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचीही बातमी समोर येत आहे. आजूबाजूच्या लोकांच्या गर्दीबरोबरच अग्निशमन आणि आरोग्य विभागाच्या पथकांसह पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. बेमेतरा येथील बेरला ब्लॉकच्या बोरसी गावात हा कारखाना सुरु होता.

दरम्यान, अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे अनेकांना जीव गमवावा लागण्याची शक्यता आहे. कारखान्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या पथकाकडून ढिगारा हटवला जात आहे. अपघाताच्या वेळी कारखान्यात सुमारे 100 लोक काम करत होते.

छत्तीसगडमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर एसडीआरएफचे 20 सदस्यीय बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. यासोबतच रायपूर येथून एक आणि दुर्ग येथून दोन अग्निशमन वाहनेही रवाना करण्यात आली आहेत. टीम पोहोचल्यानंतर ते आराखडा तयार करतील आणि बचावकार्य सुरु करतील.

जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले, म्हणाले- तपास सुरु आहे

या प्रकरणाची माहिती देताना बेमेतराचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा म्हणाले की, एसडीआरएफची टीम येताच ढिगारा हटवण्याचे काम तातडीने सुरु केले जाईल. ही घटना कोणत्या कारणामुळे घडली हे आता सांगणे कठीण आहे. कारण तो गनपावडरचा कारखाना होता, रसायनेही होती.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket