यशोदा कॉलेज ऑफ पॉलीटेक्निक मध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन
नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत आणि मार्गदर्शनासाठी मान्यवरांची उपस्थिती
सातारा -यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या फॅकल्टी ऑफ पॉलिटेक्निक मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आज संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. दिनकर पाटील, सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सतीश बुध्दे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये इंडक्शन आणि ओरिएंटेशन प्रोग्रॅम चे वेगळे महत्त्व आहे. आपण अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यानंतर त्या अभ्यासक्रमाविषयीची इथंभूत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच प्रवेशानंतर ची शैक्षणिक कारकीर्द अधिक भक्कमपणे पार करण्यासाठी या प्रकारच्या मार्गदर्शनाचे विशेष महत्त्व असते.
यशोदा कॉलेज ऑफ पॉलीटेक्निक मध्ये उपलब्ध असणारे अभ्यासक्रम, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, अभ्यासक्रमांची ओळख, तसेच एकंदरीत शैक्षणिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरत असतात. समाज मनाचे प्रबोधन करण्यासाठी आवश्यक असणारी मूल्ये जोपासणारे प्रशासकीय अधिकारी तसेच शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्ती यांचे मार्गदर्शन अशावेळी होणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फायद्याचे ठरत असते. म्हणूनच यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना त्यांना सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदाऱ्यांची जाणीव करावी तसेच एक विद्यार्थी राष्ट्र निर्माण मध्ये योगदान करेल अशा प्रकारचा निर्माण व्हावा म्हणून या प्रकारे केले जाणारे मार्गदर्शन हे महत्त्वाचे ठरते. यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वतीने नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील या प्रवेशोत्सवासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.