देशातील सर्वात श्रीमंत पक्ष भाजपाच्या सातारा जिल्हा कार्यालयाचे शुक्रवारी भूमिपूजन
सातारा (अली मुजावर )भाजप हा संघटनात्मक बांधणीवर आधारलेला पक्ष आहे. संघटनेच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा समाजात रुजविणे, ही पूर्वीपासूनची कार्यपद्धती आहे. त्यात पक्षाच्या कार्यालयाला महत्त्वाचे स्थान आहे.
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयाची उभारणी खेड (सातारा) येथील कोयना सोसायटीमध्ये केली जाणार आहे. या इमारतीचे भूमिपूजन भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. हा कार्यक्रम या शुक्रवार, दि. ९ रोजी सकाळी क. १० वाजता होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष वा धैर्यशील कदम यांनी पत्रकारपरिषदेत दिली. कदम म्हणाले,भाजपचे प्रशस्त असे कार्यालयाची नव्याने उभारली केली जाणार आहे. हे कार्यालय कोयना सोसायटीमध्ये उभारले जाणार आहे. या कार्यालयाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पाटील यांच्या हस्ते होईल
सातारा जिल्ह्यामध्ये अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या घरकुलांचे प्रस्ताव जिल्हा परिषद मध्ये पडून असून सत्तेत असणारा भाजप पक्ष याबाबत उदासीन असलेला दिसून येतो. सर्वसामान्यांना घरकुल कधी मिळणार असा सवाल नागरिक करत आहेत.