Follow us

Home » खेळा » कराटे परीक्षेत गौरीशंकरच्या सुखात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

कराटे परीक्षेत गौरीशंकरच्या सुखात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

कराटे परीक्षेत गौरीशंकरच्या सुखात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
लिंब – इंडियन गेनसई रियू कराटे दो इंटरनॅशनल फेडरेशन यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत गौरीशंकरच्या डॉ. पी .व्ही सुखात्मे स्कूल लिंबच्या 40विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बेल्ट वाटप गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण, कराटे प्रशिक्षक संतोष माने अदि प्रमुख उपस्थित होते
श्रीरंग काटेकर म्हणाले की कराटे परीक्षेत गौरीशंकरच्या डॉ. पी. व्ही सुखात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथमच चमकदार कामगिरी केली असून विद्यार्थ्यांच्या या यशाचा आम्हाला अभिमान वाटतो.
प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण म्हणाले की विद्यार्थ्यांनी कराटे परीक्षेतील यशाबरोबरच प्रशिक्षणात ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप ,संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे ,प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर, प्राचार्या डॉ.नवनीता पटेल यांनी अभिनंदन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण यांनी केले.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket