Follow us

Home » राज्य » शिक्षण » गौरीशंकरच्या डॉ. पी .व्ही .सुखात्मे स्कूलचे पर्यावरण पूरक कार्य:- श्रीरंग काटेकर प्रवेश घेणार्‍या विद्यार्थीना वृक्ष भेट देवून स्वागत 

गौरीशंकरच्या डॉ. पी .व्ही .सुखात्मे स्कूलचे पर्यावरण पूरक कार्य:- श्रीरंग काटेकर प्रवेश घेणार्‍या विद्यार्थीना वृक्ष भेट देवून स्वागत 

गौरीशंकरच्या डॉ. पी .व्ही .सुखात्मे स्कूलचे पर्यावरण पूरक कार्य:- श्रीरंग काटेकर प्रवेश घेणार्‍या विद्यार्थीना वृक्ष भेट देवून स्वागत 

लिंब – पर्यावरण चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी गौरीशंकरच्या डॉ पी व्ही सुखात्मे इंग्लिश मिडियम स्कूल लिंबने (CBSE) अनोखा उपक्रम हाती घेतला आहे .विद्यार्थी पालक याचा वृक्ष लागवड व संवर्धन मध्ये सहभाग करून घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये स्कूलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व. त्यांच्या पालकाना एक वृक्ष भेट देवून त्यांचे स्वागत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. वृक्षलागवड व संवर्धन काळाची गरज असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गौरीशंकरच्या डॉ पी व्ही सुखात्मे स्कूल लिंबने हि मोहीम हाती घेतली शिक्षणाबरोबरच विद्यार्थी पालक यांना पर्यावरण पूरक चळवळीत सहभागी करून एक नवी चळवळ उभी करण्याचे ध्येय ठेवून स्कूलने हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून वृक्ष लागवडीचे महत्व त्याची उपयुक्ताता याबाबत हि प्रवेश घेते वेळी प्रबोधन केले जात आहे. निसर्ग आणि मानवी जीवनाचे अतूट ऋणानुबंधाचे नाते अधिक घट्ट करणे हा या उपक्रमा पाठीमागील मुख्य हेतू असल्याचे संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी सांगितले . स्कूलच्या या अनोख्या उपक्रमाने पालक वर्ग भारावून गेले आहेत जशी विद्यार्थीच्या निरोगी संगोपनाची जबाबदारी पालक घेतात तशीच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी पालकानी घेऊन निसर्ग सौदर्या फुलवावे हि स्कूलची अपेक्षा आहे या उपक्रमाचे निसर्गप्रेमी व पालक वर्गाकडून स्वागत केले जात असून हि चळवळ सर्व स्कूल मधून राबविली जावे अशा प्रतिक्रिया पालक वर्गाकडून व्यक्त होत आहे.

या उपक्रमासाठी स्कूलचे प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरूध्द जगताप ,प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर यांचे मार्गदर्शन लाभले.

– निसर्गातील वृक्षतोडीने तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून निसर्गाची चक्र बदलली आहे त्यामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज बनली असून प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket