Follow us

Home » देश » राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्वर येथे आगमन प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले स्वागत

राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्वर येथे आगमन प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले स्वागत

राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्वर येथे आगमन

प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले स्वागत

महाबळेश्वर :राज्यपाल रमेश बैस यांचे आज महाबळेश्वर येथील राजभवन येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुष्पगुच्छ देवून प्रशासनाच्यावतीने स्वागत केले.

राज्यपाल रमेश बैस हे महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असून त्यांचे आज सायंकाळी ६ वा. आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रामबाई बैस यांचेही आगमन झाले. याप्रसंगी राज्यपाल महोदय यांच्या सहसचिव श्रीमती श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार काटकर यांनीही पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल श्री. बैस यांचे स्वागत केले. राज्यपाल महोदय हे शनिवार दि. 25 मे 2024 पर्यंत महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket