Follow us

Home » राज्य » महाबळेश्वर तालुक्यातील अनाधिकृत बांधकामांवर जिल्हा प्रशासनाचा हातोडा

महाबळेश्वर तालुक्यातील अनाधिकृत बांधकामांवर जिल्हा प्रशासनाचा हातोडा

महाबळेश्वर तालुक्यातील अनाधिकृत बांधकामांवर जिल्हा प्रशासनाचा हातोडा

महाबळेश्वर: महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुट, पाचगणी आणि गुरेगर येथील अनेक अनाधिकृत बांधकामे आज सकाळी महसूल विभागाकडून पाडण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

सकाळी 6 वाजताच तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाईला सुरुवात झाली. वाई प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, वाई तहसीलदार सोनाली मेटकरी, खंडाळा तहसीलदार अजीत पाटील, पाचगणी मंडलाधिकारी चंद्रकांत पारवे, महाबळेश्वर मंडलाधिकारी खटावकर यांच्यासह सर्व तलाठी आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून संयुक्त कारवाई करण्यात आली.

गुरेघर येथील प्राची नागपूरवाला आणि उद्यम पंचमढीया यांचे दोन अनधिकृत बंगले जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. तसेच मेटगुट येथील हॉटेल शंभाला देखील पाडण्यात आले.

या मोहिमेमध्ये महाबळेश्वर महसूल विभागाचे शंभरहून अधिक कर्मचारी आणि पोलीस सहभागी झाले होते. गुरेघरमधील दोन मोठे बंगले पाडल्याने अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

या कारवाईमुळे महाबळेश्वरमधील अनाधिकृत बांधकामांवर आळा घालण्यास मदत होईल अशी आशा आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket