Follow us

Home » राजकारण » गोडोली सह शहराच्या हद्दवाढीमधील भागामध्ये कोट्यावधीची विकास कामे आपण हाती घेतली आहेत. या भागात राहणाऱ्या लोकांचे मतदान मोठ्या संख्येने व्हावे : ऍड.डीजी बनकर

गोडोली सह शहराच्या हद्दवाढीमधील भागामध्ये कोट्यावधीची विकास कामे आपण हाती घेतली आहेत. या भागात राहणाऱ्या लोकांचे मतदान मोठ्या संख्येने व्हावे : ऍड.डीजी बनकर

शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावं गोडोलीत कोपरा सभेला प्रचंड प्रतिसाद.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे महायुतीच्या शिष्टाचाराच्या पाठीशी राहायचं की भ्रष्टाचारी लोकांना मदत करायची, हे जनतेनेच ठरवावे.

सिंचन खाते ताब्यात असताना विरोधी उमेदवाराने जिल्ह्यासाठी एक पैसाही आणला नाही त्यामुळे उमेदवाराला नैतिकदृष्ट्या मत मागायचा अधिकार राहिलेला नाही. त्यांचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी विरोधक काहीही बरळत आहेत. त्यांच्या नेत्याला विदर्भ, कोकण, मराठवाडा, खानदेशात काहीच काम राहिले नसल्याने अडीच जिल्ह्यांचे नेतृत्व त्यांच्याकडे उरलेले आहे. त्यामुळेच माझ्या विरोधात त्यांनी जिल्ह्यामध्ये चार सभा लावल्या आहेत असे उदयनराजे म्हणाले.

विरोधकांनी केवळ जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. याउलट केंद्र व राज्यातील महायुतीच्या सरकारने मोठा निधी देऊन जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण केले. जिल्ह्यातील गावागावात रस्ते पाणी योजना पोहोचवल्या. हीच निवडणुकीसाठी आपली जमेची बाजू असून लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये महायुतीचे सहाही आमदार निवडून आणण्यासाठी मी कष्ट घेणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील आपण एकत्र काम करायचे असून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे आहेत असे उदयनराजे म्हणाले.

ऍड.डी.जी बनकर म्हणाले, भविष्याच्या प्रगतीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मतांचा टक्का वाढवण्याची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांवर आहे. गोडोली सह शहराच्या हद्दवाढीमधील भागामध्ये कोट्यावधीची विकास कामे आपण हाती घेतली आहेत. या भागात राहणाऱ्या लोकांचे मतदान मोठ्या संख्येने व्हावे,यासाठी नियोजन करावे लागेल.

‘त्यांनी’ कॉलर उडवून माझ्या विजयाचे दिले संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साताऱ्यात सभा घेऊन माझ्यासारखी कॉलर उडवण्याची स्टाईल केली. त्यांनी केलेले अनुकरण हे माझ्या विजयाचे संकेत आहेत.

श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले

सातारा शहरातील गोडोली येथे भैरवनाथ पटांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी आमदार श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी नगरसेवक एडवोकेट डी.जी. बनकर, शेखर मोरे पाटील, विजय नाफड, एडवोकेट बाळासाहेब बाबर, शिरीष चिटणीस, सुनिता फरांदे, अविनाश कदम, अमोल मोहिते, जिल्हा परिषद संस्था फेडरेशनचे संचालक व्यंकटराव मोरे, माजी पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, भाजप महिला व मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या सुवर्णताई पाटील, अजिंक्यतारा सूतगिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, संभाजीनगरचे सरपंच सतीश माने राजू पिसाळ, सागर भोसले, सचिन तेरोडकर, फिरोज पठाण, माजी नगराध्यक्ष अशोक मोरे यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket