Follow us

Home » देश » मुसळधार पावसाने वाई वाठार रस्त्यावर झाड कोसळले वाहतुकीची झाली कोंडी

मुसळधार पावसाने वाई वाठार रस्त्यावर झाड कोसळले वाहतुकीची झाली कोंडी

मुसळधार पावसाने वाई वाठार रस्त्यावर झाड कोसळले वाहतुकीची झाली कोंडी

वाई प्रतिनिधी :वाई वाठार रस्त्यावरील ओझर्डे गावच्या हद्दीतील चाहुर फाट्यावर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसा मुळे भले मोठे बाभळीचे झाड कोसळल्याने दुतर्फा बाजु कडुन होणारी वाहतूक ठप्प झाली होती .सुदैवाने यात कुठलीही हानी झाली नाही .

सविस्तर वृत्त असे कि हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात विजांचा कडकडाटा बरोबर ढगांचा गडगडाटासह गारांचा मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहीती दिली असल्याने याची चोख खबरदारी वाईचे बांधकाम विभागाचे ऊप अभियंता महेश गोंजारी यांनी घेवुन वाई तालुक्यातील कुठल्याही रस्त्यावर गेली दोन दिवस पडत असलेल्या  मुसळधार पावसात रस्त्यांनच्या दुतर्फा असणारी झाडे कोसळु शकतात असा अंदाज बांधुन त्यांनी स्वताच्या कार्यालयात २४ तास रस्त्यावर अचानक पणे पडलेली झाडे तात्काळ बाजुला काढण्या साठी झाडे कापण्या साठी कटर आणी शाखा अभियंता सुनील गोरे व त्यांच्या सोबतीला सहाय्यक म्हणून काही कर्मचारी ठेवले आहेत .

सोमवार दि. १३ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वाई वाठार रस्त्यावर असणार्या ओझर्डे गावच्या परिसरात वारा आणी गारांनसह मुसळधार पावसाची सुरवात झाली आणी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ओझर्डे गावच्या हद्दीतील चाहुर फाट्यावर बलाढ्य बाभळीचे झाड कोसळले आणी त्यामुळे वाईकडे आणी वाठारकडे जाणारी वाहतुक थांबल्याने दुतर्फा वाहणांच्या रांगा लागल्याची माहिती ऊप अभियंता महेश गोंजारी यांना मिळताच त्यांनी तातडीने आपतकलीन परस्थीतीवर मात करण्यासाठी उभी केलेली यंत्रणा तात्काळ पाठवुन यंत्रणेने भर पावसात अवघ्या अर्ध्या तासात झाड बाजुला काढुन तुंबलेली वाहतुक सुरळीत केली .रस्त्यावर पडत असलेल्या पावसा मुळे कुठेही झाडे पडली तरी वाहन चालकांनी अथवा नागरिकांनी घाबरुन न जाता बांधकाम विभागाला मोबाईल वरुन माहिती द्या त्या ठिकाणी अवघ्या १५ मिनिटांतच आमची यंत्रणा पोहचुन रस्ता मोकळा करेल असे आवाहन वाईच्या बांधकाम विभागाचे ऊप अभियंता महेश गोंजारी यांनी केले आहे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket