वाई येथे खासदार उदयनराजे भोसले यांचे काम जोरात सुरू असून सर्वात जास्त मताधिक्य आम्ही देणार -मा. नितिनकाका पाटील
सातारा -भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सर्व मित्र पक्षांनी आयोजित केलेल्या सातारा येतील पत्रकार परिषदेत यावेळी नितीनकाका म्हणाले , आमच्यात कोणतीच नाराजी नाही असे स्पष्ट केले. वाई येथे खासदार उदयनराजे भोसले यांचे काम जोरात सुरू असून, त्यांना आम्ही मताधिक्य देणार असे स्पष्ट केले. प्रारंभी पंचवीस वर्षापासून अस्तित्वात असणाऱ्या घड्याळा चिन्हाला उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह होता. विचार होता. मात्र कालांतराने वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांचे नेतृत्व मान्य करण्याचे ठरले. आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याचे वाईकरांनी ठरवले. नाराजी नव्हती आणि नसेल असे ते म्हणाले.