Follow us

Home » राज्य » शिक्षण » हिंदवीची दहावी निकालाची परंपरा कायम

हिंदवीची दहावी निकालाची परंपरा कायम

हिंदवीची दहावी निकालाची परंपरा कायम

सातारा, ता. २७- येथील श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूलने दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची परंपरा कायम ठेवला आहे. यंदाही शाळेतील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात कायम उज्ज्वल कामगिरी करणारे हिंदवी पब्लिक स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे, त्यामुळेच या शाळेने यशाची परंपरा अखंडित ठेवली आहे. 

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे. यात शाहुपुरी हिंदवी पब्लिक स्कूलच्या अनुष्का अपूर्व डोईफोडे हिने ९५.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तर ९४.२० टक्के गुण मिळवून वेदिका देवेंद्र भोसले व श्रेया अरविंद खरटमल या दोघींनी द्वितीय, ९३.६० टक्के गुण मिळवून मानसी यशवंत देशमुख हिने तृतीय क्रमांक, ९३ टक्के गुण मिळवून सौरभ किरण माने याने चौथा व ९२ टक्के गुण मिळवून श्रावणी विश्वनाथ जरे हिने पाचवा क्रमांक मिळवला. 

तर वेदिका भोसले हिने इंग्रजी विषयात ९४ गुण, अनुष्का डोईफोडे व सानिका जाधवने मराठी विषयात ९६ गुण, सौरभ माने याने हिंदी विषयात ९४ गुण, अनुष्का डोईफोडेने संस्कृत विषयात ९४ गुण, गणित विषयात सौरभ माने याने ९५ गुण, वेदिका भोसले व अनुष्का डोईफोडेने विज्ञान विषयात ९६ गुण, श्रेया खरटमल हिने समाजशास्त्र विषयात ९७ टक्के गुण मिळवले. 

यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित कुलकर्णी, सरचिटणीस नानासाहेब कुलकर्णी, मुख्याध्यापिका मंजुषा बारटक्के, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, वर्ग शिक्षिका…. व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. 

अमित कुलकर्णी म्हणाले, सातारा शहर व परिसरात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेली संस्था आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभ्यासक्रमाबरोबरच विविध उपक्रम राबवित असतो. स्कूलच्या व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील कोणताही विद्यार्थी आयुष्यात शैक्षणिकदृष्ट्या कमी पडू नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन इयत्ता पहिली पासूनच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांतर्गत अभ्यासक्रम पूर्ण करून घेत असतात. तसेच इयत्ता दहावीला आल्यानंतर गरजेनुसार गुणवत्तेनुसार शैक्षणिक, मानसिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. मार्गदर्शनामुळे हिंदवी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचे फळ असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket