Follow us

Home » ठळक बातम्या » शिवाजीनगर सोसायटीला उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्काराचा सन्मान 

शिवाजीनगर सोसायटीला उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्काराचा सन्मान 

शिवाजीनगर सोसायटीला उत्कृष्ट सहकारी संस्था  पुरस्काराचा सन्मान 

खंडाळा : पारदर्शक कारभार आणि काटेकोर नियोजनाच्या बळावर शिवाजीनगर सोसायटीत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या गेल्या.  संस्थेच्या या उल्लेखनीय कामागिरीबद्दल ‘ उत्कृष्ट सहकारी संस्था ‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

          पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान या राष्ट्रीय स्तरावर सहकार प्रशिक्षण व संशोधन  कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने उत्कृष्ट सहकारी संस्था २०२४ पुरस्कारासाठी शिवाजीनगर सोसायटीची निवड करण्यात आली. पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून संस्थेने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. 

      राष्ट्रीय सहकार निती आयोगाचे अध्यक्ष माजी मंत्री सुरेश प्रभू यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अप्पर निबंधक सहकारी संस्था ज्योती मेटे , वैमनीकॉमच्या संचालिका हेमा यादव ,  दुरदर्शनचे प्रमुख प्रकाश बागल यांची प्रमुख उपस्थिती होती. हा मानाचा पुरस्कार सोसायटीचे अध्यक्ष कोमल डेरे , उपाध्यक्ष बाळू हाके , सचिव अजित शेळके यासह संचालक मंडळ यांना प्रदान करण्यात आला.  

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

आजचे राशिभविष्य 1 सप्टेंबर 2024

दैनंदिन राशिभविष्य     मेष : तुमची मानसिकता आज सकारात्मक असणार आहे. तुम्हाला तुमच्या विचारांची योग्य दिशा सापडणार आहे. मनोबलाच्या जोरावर

Live Cricket