जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा सन्मान
सातारा प्रतिनिधी : सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टीक सेंटर व कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा सातारा यांचे सयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्य क्षेत्रातील उच्चपदस्थ, उल्लेखनीय कार्य असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील शैक्षणिक पार्श्वभूमी असणाऱ्या विशेषत वैद्यकीय क्षेत्रात दैदिप्य मान उज्वल यश मिळविलेले उच्च शिक्षित पाल्य व अश्या पालकांचा उचित सन्मान व गौरव करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी डॉ.जयश्री सुरेश शिंदे डायरेक्टर सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर,प्रा. चंद्रकांत नलावडे अध्यक्ष कृतिशील निवृत्त अधिकारी सातारा शाखा,प्रा. डॉ. शामला माने, प्रा. शालिनी जगताप, श्री. सतीश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
सातारा शहरातील रहिवासी व पुणे मेट्रो रेल्वे पहिली महिला पायलट अपूर्वा प्रमोद अलटकर यांचा गौरव डॉ जयश्री शिंदे प्रा डॉ चंद्रकांत नलावडे व व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
त्याचबरोबर आपल्या करिअर क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणाऱ्या डॉ. दीपांजली पवार, प्रगती पाटील,चित्रा भिसे,डॉ.वैशाली चव्हाण,ॲड. शिवानी पळणीकर ओक,डॉ. अर्चना माचवे, प्रा. शालिनी जगताप, प्रा.अनिता शिंदे, मंगला पिसाळ, अनिता पवार, मीनाक्षी साठे यांचाही गौरव यावेळी करण्यात आला.
सदर उपक्रमास सतीश कदम, श्रीकांत देशमुख, हॉस्पिटल कर्मचारी, संघटना महिला सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.