Follow us

Home » राजकारण » वाईट काळात कधीही हाक द्या…मी तुमच्यासोबत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

वाईट काळात कधीही हाक द्या…मी तुमच्यासोबत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

वाईट काळात कधीही हाक द्या…मी तुमच्यासोबत : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

कराड, पाटण राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला विश्वास.

लोकसभा निवडणुकीसाठी तुमचे वैचारिक मत मला महत्त्वाचे वाटते. कराड-पाटणचा एकत्रितपणे विकास साधूया. चांगल्या काळात कदाचित मी तुमच्यासोबत नसेन पण वाईट काळात मला कधीही हाक द्या मी तुमच्या सोबत उभा राहीन.

कराड येथे पाटण तालुका राष्ट्रवादी पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, संयोजक सुनील काटकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अमित कदम, माजी सभापती संजय देसाई, एडवोकेट राजाभाऊ पाटील उंडाळकर, विजयसिंह यादव, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, राजेश वाठारकर पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जितेंद्र डुबल, जिल्हा उपाध्यक्ष सचिन बेलागडे, सागर भोगावकर, संपतराव जाधव, सादिक इनामदार, राजाभाऊ घाडगे, आनंदराव लादे, आप्पासाहेब गायकवाड, सागर पाटील, सादिक इनामदार, सुलोचना पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नेत्यांशी फारकत घेतली. मीही याआधी तेच केले. महात्मा गांधींच्या विचारानुसार प्रत्येक व्यक्तीला सत्तास्थान मिळाले पाहिजे. परंतु स्वातंत्र्यानंतर काँग्रेसकडे निर्विवाद सत्ता असताना सत्ता केंद्रित करण्याचे काम झाले.

लोकसभेला निवडून आल्यानंतर मी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रयत क्रांती, मनसे, जोगेंद्र कवाडे गट असा कुठलाच भेदभाव करणार नाही. सर्वांना घेऊन पुढे जाणार आहे. विकास कामे केली जात असताना सगळ्यांना विश्वासात घेऊ. स्थानिक अडचणींची माहिती तिथल्या स्थानिक नेत्यांना असते, त्यामुळे त्यांना सोबत घेऊन काम करणार आहे. कराड येथे बसस्थानक समोर संपर्क कार्यालय सुरू केले आहे, ते निवडणुकीपुरते राहणार नाही तर ते पुढेही तसेच सुरू राहील. या कार्यालयासाठी मी आठवड्यातून दोन दिवस येणार असून या ठिकाणी मला कार्यकर्त्यांना भेटता येईल.

श्री अतुल भोसले म्हणाले, महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन उदयनराजेंना निवडून द्यायचे आहे, त्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय ठेवूया. देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक असून सगळ्यांनी त्यासाठी योगदान द्यावे.

श्री अमित कदम म्हणाले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा संच एकत्रितपणे उदयनराजेंचे काम करत आहे. महायुतीचा प्रयोग देशाला पुढे नेईल. आता आम्हाला नावे ठेवणाऱ्यांनी पुलोदच्या माध्यमातून राजकारण केलं होतं ते बरोबर असेल तर येथे आमच्या भूमिकेला विरोध करण्याचा त्यांना अधिकार नाही.

श्री संजय देसाई म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते एकसंघपणे काम करून पाटण तालुक्यातून उदयनराजेंना चांगलं मताधिक्य देऊ.

श्री राजेश पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंतचा आपला देश एकसंधपणे बांधला साठ वर्षातील विचार करण्याचे काम दहा वर्षात घडले आहे.

श्री जितेंद्र डूबल म्हणाले, शिवछत्रपतीं सरकार राजा पाच हजार वर्षात झाला नाही आणि पुढेही होणार नाही. त्यांच्या वारसदाराला संसदेत पाठवणे आपल्या सगळ्यांचे आद्य कर्तव्य आहे.

श्री एडवोकेट राजाभाऊ पाटील म्हणाले, विरोधक वेगवेगळ्या वावड्या पसरवत आहेत, त्यामुळे माथाडी कामगारांचा संयुक्तिक मेळावा लवकरात लवकर घेण्यात यावा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket