Follow us

Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » श्रावणाच्या सुरुवातीलाच देऊर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जरंडेश्वर डोंगरावर गोळा केले तब्बल ३२ पोती प्लास्टिक

श्रावणाच्या सुरुवातीलाच देऊर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जरंडेश्वर डोंगरावर गोळा केले तब्बल ३२ पोती प्लास्टिक

श्रावणाच्या सुरुवातीलाच देऊर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जरंडेश्वर डोंगरावर गोळा केले तब्बल ३२ पोती प्लास्टिक

प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, उन्नत भारत अभियान व समान संधी केंद्र आणि यंग इंस्पायरेटर्स नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने जरंडेश्वर डोंगरावर प्लास्टिक निर्मूलन व डोंगरावरील प्लास्टिक बाटल्या संकलनाचे आयोजन करण्यात आले होते. 

प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम, त्याचा पर्यावरण तसेच मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन महाविद्यालयाने जरंडेश्वर डोंगरावरील प्लास्टिक निर्मूलनाचे उच्चाटन करणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सातारा रोडमार्गे जरंडेश्वर डोंगर चढत चढाईमार्गावरील पायऱ्यांच्याजवळ पडलेले प्लास्टिक गोळा करत सकाळच्या प्रहरात प्लास्टिक कचरा संकलनास सुरुवात केली. 

प्लास्टिक समूळ निर्मूलन अशक्य असले तरी जरंडेश्वर डोंगरावर श्रावणात श्री जरंडेश्वर मारुतीरायाचे दर्शन घ्यायला येणाऱ्या भक्त भाविकांची संख्या बर्पूर आहे. दर्शनाला येताना पाणी बॉटल, लहान मुलांना अन्नपदार्थ तसेच इतर साहित्यासाठी भक्तगण प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करतात आणि खाऊन किंवा पाणी पिऊन झाल्यावर पाण्याच्या बाटल्या तिथेच टाकतात. अशा बाटल्यांचा आणि प्लास्टिक राप्पेर हे कुजत नसल्याने त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. तसेच ते जाळण्याचा प्रयत्न केल्यास प्रदुषण वाढते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या ५० विद्यार्थ्यांनी प्लास्टिक निर्मूलनाची हि मोहीम पाच प्राध्यापकांना सोबत घेऊन जवळपास चार तास जरंडेश्वर मंदिर परिसर आणि डोंगरावर राबविली . 

सकाळच्या सत्रात प्रथम या जरंडेश्वर मंदिर परिसरातील केरकचरा झाडूच्या माध्यमातून झाडून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांचे चार गट करून पायऱ्या परिसर, मंदिराच्या मागील परिसर, बारव परिसर, समर्थ रामदास गुंफा परिसर स्वच्छ करून जवळपास चार तास प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करण्यात आले. या ५० विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक चार ठिकाणावरून तब्बल ३२ पोती प्लास्टिक बाटल्यांचे संकलन केले.

यावेळी महाविध्यालयीन विद्यार्थ्यांना जरंडेश्वर या डोंगरावरील १२० औषधी वनस्पतीच्या जाती आणि प्रजाती यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना प्लास्टिक वापराचे परिणाम आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण यावर जनजागृतीचे आवाहन करण्यात आले. 

सहा.प्रा. सुर्यकांत अदाटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, श्रावणात श्री जरंडेश्वर दर्शनाच्या निमित्ताने येणाऱ्यांनी बरोबर आणलेले प्लास्टिक बाटल्या किंवा कुरकुरे पाकिटे डोंगरावर इकडे तिकडे न टाकता त्या ठिकाणी कचरा कुंड्यांची सोय केलेली आहे त्यात व्यवस्थित टाकल्यास या धार्मिक आणि पवित्र स्थळावर तसेच डोंगरावर सगळीकडे स्वच्छता राहील आणि कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही.

डॉ. कमलसिंग क्षत्रिय यांनी सांगितले की, “श्रावणात श्री जरंडेश्वर डोंगरावर असणाऱ्या औषधी वनस्पतींची ओळख या प्लास्टिक निर्मुलन जनजागृती मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना झाली. दैनिक सकाळ अंतर्गत यिनच्या माध्यमातून देऊर महाविद्यालय अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य देत असते. डोंगरावर दर्शनाला येणाऱ्यांनी प्लास्टिकबद्दल सजगता बाळगायला हवी.” 

यासाठी यंग इंस्पायरेटर्स नेटवर्कचे समन्वयक श्री.ऋषीकेश मोरे व महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.शिवाजी चवरे यांचे सहकार्य लाभले. यावेळी श्री अनिकेत खताळ व कु.जान्हवी माने यांनी प्लास्टिक निर्मूलनाबद्दल आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.कमलसिंग क्षत्रिय, समान संधी केंद्र समन्वयक प्रा. सुर्यकांत अदाटे, सहा. प्रा. वर्षा बडेकर, सहा. प्रा. धनश्री चव्हाण, सहा. प्रा. परीन गांधी, यिन प्रतिनिधी श्री. ओम भोईटे हे यावेळी उपस्थित होते. या प्लास्टिक निर्मूलनाचे नेटके संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.कमलसिंग क्षत्रिय, समान संधी केंद्र समन्वयक प्रा.सुर्यकांत अदाटे,डॉ.उत्तम आळतेकर व डॉ.संध्या पौडमल यांनी केले होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket