Follow us

Home » ठळक बातम्या » नागठाण्यात ‘कूपर स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेचे’ उद्घाटन

नागठाण्यात ‘कूपर स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेचे’ उद्घाटन

नागठाण्यात ‘कूपर स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेचे’ उद्घाटन

कूपर उद्योग समुहाच्यावतीने नागठाणे येथे अद्यावत व सुसज्ज अशी कूपर स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे उद्घाटनाने सद्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपले उज्वल भविष्य घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सदर अभ्यासिकेचे उद्घाटन नुकतेच नागठाणे येथे कूपर उद्योग समूहाचे मा. श्री. नितीन देशपांडे मुख्य मानव संसाधन अधिकारी व मा. श्री. यशवंत साळुंखे – चेअरमन अजिंक्यतारा सह. सा. का. लि. शाहूनगर, शेंद्रे यांच्या हस्ते झाले .

सदर अभ्यासिकेत मुला – मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिकेची सोय, 600 पेक्षा अधिक मार्गदर्शक पुस्तके व स्पर्धा परिक्षा मासिके, वृतपत्रे सोय, गेस्ट लेक्चर इत्यादींची व्यवस्था केलेली आहे .

कूपर उद्योग समूह व ग्रामपंचायत नागठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने उभारलेली अभ्यासिका ही महाराष्ट्र राज्यातील पहिली अभ्यासिका ठरली आहे.

उद्घाटन समारंभावेळी मा. श्री. नितीन देशपांडे साहेब बोलत असताना त्यांनी कूपर उद्योग समूहाच्या 100 वर्षाच्या सामाजिक दायित्वच्या परंपरेबद्दल व मा. श्री. फरोख कूपर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या समाजाभिमुखः अनेक उपक्रमांबाबत माहिती दिली. तसेच या अभ्यासिकेचा नागठाणे पंचकोशीतील सर्व युवक व युबतींना मोठया प्रमाणात लाभ मिळेल व प्रत्येक गावातील अनेक विद्यार्थी या अभ्यासिकेच्या माध्यमातून अधिकारी पदावर पोहचतील यामुळे त्यांच्या सोबत त्या गावांचाही विकास नक्कीचं होईल, असा विश्वास व्यक्त केला.

डॉ. सौ. रूपाली बेंद्रे – सरपंच नागठाणे, यांनी सदर अभ्यासिका ही नागठाणे पंचकोशीतील सर्व युवक युवतींना एक वरदान ठरेल असे मत व्यक्त केले. या उपकमासाठी सर्व नागठाणे परीसरातील ग्रामस्थ विद्यार्थी कूपर उद्योग समूहाचे मनापासून आभार मानले..

सदर उद्घाटन समारंभास वरील मान्यवरांसोबत मा. श्री. अनिल साळुंखे – उपसरपंच नागठाणे, डॉ. अजित जाधव सर प्राचार्य – आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे, श्री जाधव जय हिंद अकॅडमी, श्री अजित साळुंखे, श्री. संजय साळुंखे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी, कूपर उद्योग समूहाकडून श्री. सचिन खटावकर, श्री. महेश खरे, श्री. दिगंबर सांडगे, श्री. सुनिल इंगवले तसेच गावातील रहिवासी कूपर उद्योग समूहातील कामगार व कर्मचारी सर्वश्री सागर साळुंखे, अनिकेत देशमुख, अजय नलवडे, अभिषेक साळुंखे, प्रशांत साळुंखे, मच्छिंद्र चव्हाण, महेश चक्के, अधिक नावडकर, किरण जाधव, दत्ताञय जाधव, संदिप बागल, निवास बागल, किशोर बागल, शंकर नावडकर, संदिप जाधव, अनिल कांबळे, अखिलेश गोरे, महेश धुमाळ, संदिप ह. बागल, नितीन धुमाळ, सचिन धुमाळ, मच्छिंद्रनाथ जाधव, अविनाश राठोड, रोहन साळुंखे, प्रथमेश साळुंखे, तेजस बागल, सुजित साळुंखे तसेच नागठाणे, सासपडे, निनाम-पाडळी, भरतगाववाडी, अतित, माजगाव, अपशिंगे, मांडवे, बोरगाव येथील कूपर उद्योग समूहाचे कामगार व कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

कूपर अभ्यासिकेच्या उद्घाटन करत असताना मा. श्री. नितीन देशपांडे – मुख्य मानव संसाधन अधिकारी व मा. श्री. यशवंत साळुंखे, डॉ. सौ. रूपाली बेंद्रे, श्री. अनिल साळुंखे व सर्व मान्यवर

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket