श्री डेंटल व सर्जिकल क्लिनिकचा शुभारंभ
सातारा, दि. २६ : फेसिओमॅक्झलरी अॅण्ड ओरल कॅन्सर सर्जन डॉ. राजवर्धन अनिल शिंदे यांच्या श्री डेंटल व सर्जिकल क्लिनिकचा शुभारंभ मंगळवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता केशव सोना कॉम्प्लेक्स, रविवार पेठ, कॉसमॉस बँकेच्या खाली होत आहे.
या क्लिनिकचा शुभारंभ सातारा हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरचे मॅनेजिंग डायरेक्टर व सिनिअर फिजिशिअन डॉ. सुरेश शिंदे यांच्या हस्ते व दैनिक ऐक्यचे संपादक शैलेंद्र पळणिटकर, जिल्हा शल्यचिकित्सक युवराज करपे, सिनिअर डेंटल सर्जन डॉ. प्रमोद कोदे यांच्या प्रमुख | उपस्थितीत होणार आहे.