भारतीय स्वातंत्र्यलढ्यात वीर सावरकरांचे योगदान मोलाचे- श्रीरंग काटेकर
गौरीशंकर बी फार्मसी लिंब मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
लिंब – इंग्रजी जुलमी सत्ते विरोधात प्रखर संघर्ष करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब ता. जि.सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी डॉ. संतोष बेल्हेकर, डॉ.धैर्यशील घाडगे, डॉ.स्फूर्ती साखरे ,प्रा. रोहन खुटाळे, प्रबंधक निलेश पाटील अदि प्रमुख उपस्थित होते.
श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वीर सावरकरांनी असंख्य आंदोलने केली देशनिष्ठेने भारविलेले वीर सावरकरांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी संपूर्ण आयुष्य देशसेवेला वाहून घेतले क्रांतिकारी विचारधारा जोपासणाऱ्या वीर सावरकरानी अनंत यातना भोगल्या त्याचा जीवन संघर्ष आजही नवतरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेची पूजन जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
चौकट – स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञानवादी ध्येयवादी वृत्तीचे होते त्यांनी क्रांतिकारी विचाराबरोबरच सामाजिक परिवर्तन विषयी समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. विशेषता अज्ञान अंधश्रद्धा या विचारधारेला मूठमाती देऊन समाज शिक्षीत करण्याची अनमोल कार्य केले साहित्यिक लेखक कवी विचाराचे वीर सावरकर यांनी जन्मभर देशसेवाला वाहून घेतले त्यांचे आदर्श विचारधारा आज ही समाजासाठी प्रेरक ठरत आहे गौरीशंकरच्या लिंब शैक्षणिक संकुलनात वीर सावरकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार विजय निकम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय विभाग व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले
– स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेच्या पूजन प्रसंगी श्रीरंग काटेकर ,डॉ. संतोष बेल्हेकर, डॉ. धैर्यशील घाडगे, निलेश पाटील