Follow us

Home » ठळक बातम्या » इनसाइड स्टोरी: मा.देवेंद्र फडणवीस शब्द न पाळणारे नेते?

इनसाइड स्टोरी: मा.देवेंद्र फडणवीस शब्द न पाळणारे नेते?

इनसाइड स्टोरी: मा.देवेंद्र फडणवीस शब्द न पाळणारे नेते?

सातारा (अली मुजावर )आपले संत सांगतात,बोले तैसा चाले त्यांची वंदावे पाऊले बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले” – ही म्हण ज्या काळातील आहे तेव्हा बहुतेक खूपच सकारात्मक विचार असावेत कारण “जे बोलला आहे त्या प्रमाणे त्याने करून दाखवले तर त्याचे कौतुक करावे” पण कौतुक करण्यासारखे कृत्य असेल तर ठीक नाही तर कशावरून तो कौतुकास पात्र…

२०१४ ते २०१९ या काळात मा.देवेंद्र फडणवीस साहेबानीं महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि राजकीय मातब्बर म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जनता पाहते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील सर्वात मोठा पक्ष असणारा भाजपास महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात पडझड झालेली दिसून येते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक खासदार निवडून आलेल्या भाजपाला यावेळी मात्र महाराष्ट्रामध्ये कमी जागा मिळाल्या. शिवसेनेस असणारा 2024 चा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये तो भाजपास मिळाला. या ठिकाणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काटेरी लढतीत शरद पवार राष्ट्रवादी गटातील उमेदवार शशिकांत शिंदे यांचा बत्तीस हजारांनी मतांनी पराभव केला. महाराष्ट्रातील महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना(शिंदे गट) हा मतदारसंघ न मिळाल्याने शिवसेनेत नाराजी होती. मात्र शिवसेनेकडून प्रबळ दावेदार असणारे पुरुषोत्तम जाधव यांनी लोकसभेची मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी केली होती. पडद्यामागून झालेल्या नाट्यमय घडामोडीत पुरुषोत्तम जाधव यांनी माघार घेतली आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात त्यांनी प्रामुख्याने काम केले. नाराज पुरुषोत्तम जाधव यांनी प्रामाणिकपणे भाजपा साठी काम केले. पुरुषोत्तम जाधव यांना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी राजकारणात दिलेला शब्द पाळला नाही. बंद दारा आड झालेल्या चर्चेत सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिलेला शब्द महत्त्वाचा असतो. संघटनात्मक कोणतेही पद न दिल्यामुळे पुरुषोत्तम जाधव हे नाराज असल्याचे दिसून येते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुरुषोत्तम जाधव आपली वेगळी भूमिका घेणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. 

महाराष्ट्रातील लोकसभा पराभवानंतर भाजपा विधानसभा निवडणूक तेवढी सोपी राहिलेली नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहेत.कोणताही राजकीय पक्ष हा त्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याविना अपूर्णच असतो हा सर्वसामान्य कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा आधार असतो, या कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेच्या भक्कम पायावरच पक्षाच्या राजकीय यशस्वीतेचा डोलारा उभा राहिलेला असतो . हा कार्यकर्ता ऊन, वारा, पाऊस यामध्ये देखील आपल्या पक्षाच्या हितासाठी सदैव उभा असतो. 

वाई येथे झालेल्या लोकसभा 2024 च्या निवडणुकी प्रचारादरम्यान मा. अजितदादा पवार यांनी नितीनकाका पाटील यांना खासदार करण्याचा शब्द पाळला आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ दिले.मात्र देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारणात अनेक कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पाळला नसल्याची खंत कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. येणाऱ्या काळात भाजपासाठी महाराष्ट्रातील सत्ता राखण्यासाठी अवघड जाऊ शकते.वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुषोत्तम जाधव यांनी वेगळा ठसा उमटवला आहे. हजारो कार्यकर्त्यांचा त्यांना असणारा पाठिंबा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारास फटका बसू शकतो. 

 

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket