Follow us

Home » ठळक बातम्या » वाई पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जितेंद्र प्रभाकर शहाणे यांनी पदभार स्वीकारला

वाई पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जितेंद्र प्रभाकर शहाणे यांनी पदभार स्वीकारला

वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)वाई पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जितेंद्र प्रभाकर शहाणे यांनी पदभार स्वीकारला

वाई :-वाई पोलीस खात्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जितेंद्र प्रभाकर शहाणे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. याआधीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांची सातारा जिल्ह्यात विशेष शाखेत बदली झाल्याने रिक्त जागेवर त्यांनी पदभार स्वीकारला. बाळासाहेब भरणे यांनीही सातारा येथे आपला पदभार स्वीकारला.

जितेंद्र शहाणे हे मूळ पुण्याचे असून त्यांनी पोलीस खात्यात सुमारे 30 वर्षे उल्लेखनीय कामगिरी केली आहे. उपनिरीक्षक म्हणून नागपूर, पुणे, लातूर, सोलापूर ग्रामीण, सांगली, मुंबई (लाचलुचपत ) येथे काम पाहिले.

तदनंतर पोलीस निरीक्षक म्हणून अमरावती व पुणे येथे सीआयडी, सांगली येथे काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात सन 2016 मध्ये मिरज येथे दरोडा पडला असता त्यातील दहा आरोपी मुद्देमालासह दोन दिवसात पकडून विशेष कामगिरी केली होती.

वाईतील वाहतुकीची समस्या, बाल गुन्हेगारी व प्रबोधन, तडीपार गुन्हेगार या बाबीसह इतर सर्व बाबीत ते विशेष लक्ष देणार आहेत. वाई पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचा विशेष प्रयत्न करणार आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये इंजिनिअरिंगच्या प्रगत आणि अद्ययावत पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना सुरुवात

यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये इंजिनिअरिंगच्या प्रगत आणि अद्ययावत पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना सुरुवा सायबर सिक्युरिटी, मेकेट्रोनिक्स आणि रोबोटिक्स या नवीन अभ्यासक्रमांसह,

Live Cricket