पत्रकार भवनाच्या स्वप्नपूर्तीचे हरीष पाटणे खरे जनक
सातारा – शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास लाभलेल्या सातारच्या भूमीत पत्रकारांसाठी एक हक्काचे व्यासपीठ पत्रकार भवनांच्या रूपाने उभे राहत आहे. भव्य व सुसज्ज चार मजली इमारतीचे दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या अडचणी जाणणारे एक सक्षम नेतृत्व म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्याकडे पाहिले जाते. त्याच्या अखंड पाठपुराव्याला पत्रकार भवनाच्या रूपाने अखेर यश आले असून त्यांच्या गौरवशाली कार्याचा गौरीशंकर जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी घेतलेला एक आढावा….
सातारा जिल्ह्यातील असंघटित पत्रकार बंधूंना संघटित करून त्यांच्यामध्ये स्वाभिमानाची ज्योत फुलवून नवा आत्मविश्वास जागृत करणारे सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या अथक परिश्रमाला अखेर यश आले आहे .शंभर वर्षाचा पत्रकारितेचा वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्याला एक सक्षम नेतृत्व हरीष पाटणेंच्या रूपाने लाभल्याने आज साताऱ्यात सुसज्ज पत्रकार भवनाची इमारत उभी राहिली आहे. अर्थात यासाठी हरीष पाटणे यांनी सर्वांना बरोबर घेऊन दाखवलेला विश्वास आज खऱ्या अर्थाने सार्थक झाला आहे .पत्रकारांच्या व्यथा व वेदना जाणाऱ्या या नेतृत्वाने संघर्षातून नेतृत्व फुलविले आहे. त्यांनी पत्रकार भवन उभारणीसाठी सातत्याने श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले व विविध सामाजिक संस्था लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्याकडे केलेला पाठपुरावा पाहता एक
ध्येयवादाने प्रेरित झालेली व्यक्ती इच्छाशक्ती असेल तर अशक्य ते शक्य करून दाखविते हे हरीष पाटणे यांनी सिद्ध केले आहे. सातारा जिल्ह्याच्या पत्रकार बंधूंनी पाहिलेले स्वप्न 14 फेब्रुवारी 2024 रोजी साकार होत आहे. पञकारांना हक्काचे व्यासपीठ उभारताना पत्रकारांच्या कुटुंबाचा ही या ठिकाणी विचार करून या भवनांमध्ये अद्यावत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. सातारच्या भूमीत उभारलेले ही वास्तू संपूर्ण राज्य पत्रकार बंधूंसाठी एक आदर्शवत ठरणार आहे. एक विचार एक ध्यास मनात असेल तर स्वप्नपूर्ती सहज घडू शकते याचे एक उत्तम उदाहरण या भवनांच्या निर्मितीतून दिसून येत आहे. पत्रकार भवन उभारणीसाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी हरीष पाटणे यांच्यावर दाखवलेला विश्वास ही तितकाच महत्वाचा ठरला आहे. त्यांना या कामी विशेष साथ देणारे सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, दैनिक पुढारीचे संपादक जीवनधर चव्हाण, मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष शरद काटकर, दैनिक तरुण भारतचे संपादक दीपक प्रभावळकर, सदस्य चंद्रसेन जाधव, गोरख तावरे, दैनिक लोकमतचे संपादक दीपक शिंदे व जिल्ह्यातील जेष्ठ व मान्यवर पञकाराचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभत आहे. सातारच्या भूमीत उभारलेले पत्रकार भवन पत्रकारांच्या सवर्गिण उत्कर्षाला पूरक ठरणार आहे. स्वमालकीचे भवन पत्रकारांना उपलब्ध झाल्याने पत्रकारांच्या कार्यशैलीत व गुणात्मक बदलास संधी मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या पत्रकारांच्या अडचणी समस्या या दूर करण्यासाठी या ठिकाणी निवासाची सोयही करण्यात आली आहे. पत्रकारितेला दर्जात्मकता अधिक व्यापक व्हावी हा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी पञकारासाठी कार्यशाळा व स्वतंत्र बैठक व्यवस्था ,सुसज्ज अभ्यासिका, वाचनालय ,इत्यादी सोयी सुविधा केल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी पाहिलेली पत्रकार भवनाची स्वप्नपूर्ती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी करून दाखविली आहे.
चौकट – वृत्तसृष्टीचे जनक स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या वैचारिक विचाराची जपणूक करताना पत्रकारितेतील स्वाभिमानी बाण्याची ज्योत अखंडपणे तेवत ठेवून जिल्ह्याच्या पत्रकारकाच्या सवर्गिण प्रगतीसाठी झटणारे एक झुंजार नेतृत्व म्हणून हरिष पाटणे कडे पाहिले जाते गेली 24 वर्षे अखंडपणे वृत्तपत्राची योगदान देणारे हरीष पाटणे आज पत्रकारांबरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. स्पष्ट व परखड विचार मांडणारे हरीष पाटणे आज समाजाच्या ज्वलंत प्रश्नासाठी धावून जातात शौर्य गाथेचा आणि पराक्रमाचा इतिहास असणाऱ्या सातारच्या भूमीत हरीष पाटणे यांनी नवक्रांती घडविली आहे.
श्रीरंग काटेकर
जनसंपर्क अधिकारी
गौरीशंकर नाॅलेज सिटी सातारा