कै. दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेने महाराजांचे संस्कार जपले : ज्ञानदीपचे चेअरमन जिजाबा पवार ; दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेच्या पांचगणी शाखेचे उद्घाटन
पांचगणी : सध्या सहकार क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आणि आव्हाने निर्माण झाली आहेत. अध्यात्मिक आणि सहकाराचा महामेरू समजल्या जाणाऱ्या दत्तात्रय कळंबे महाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या जावली तालुक्यातील कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेने त्यांचे संस्कार आणि संस्कृती जपली असल्याने संस्थेला उज्वल भवितव्य असल्याचे गौरवोद्गार ज्ञानदीप को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष जिजाबा पवार यांनी केले.
दापवडी येथील दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेला जिल्हा कार्यक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून पांचगणी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी श्री पवार बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, जावळी बँकेचे संचालक चंद्रकांत गावडे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासूर्डे, लक्ष्मी कऱ्हाडकर, महाबळेश्वरचे सहकार अधिकारी सुहास आंब्राळे, उन्नती फायनांसचे अध्यक्ष हणमंत रांजणे, अभयलक्ष्मीचे उपाध्यक्ष अशोक गोळे , उद्योजक हरीश गोळे, प्रकाश गोळे, अंकुश मालुसरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हणमंतराव पार्टे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्विय सहाय्यक नितीन गावडे, ज्ञानदीपचे मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण , जगन्नाथ शिंदे, बाजार समिती संचालक राजेंद्र भिलारे, गुलाब गोळे, सुनील मालुसरे, गुलाब गोळे, रोटरीचे माजी अध्यक्ष महेंद्र पांगारे,दिलीप आंब्राळे, संतोष आंब्राळे, शशिकांत भिलारे, प्रशांत भिलारे, संजय बेलोशे, रमेश रांजणे, वसंत बेलोशे, संतोष चिकणे, अरविंद कळंबे, रामदास रांजणे,महादेव रांजणे, धनंजय शिंदे, हरिभाऊ गोळे, चंद्रकांत बेलोशे, संस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, व्हा. चेअरमन हरिश्चंद्र गावडे, तुकाराम घाडगे, बाबुराव रांजणे, विजय रांजणे, प्रकाश रांजणे, रामचंद्र चिकणे, मधुकर पवार, भीमराव खरात, इंदू शिंदे, रामचंद्र बेलोशे, शिवराम पवार, संस्थेचे सचिव अनिल रांजणे तसेच संस्थेचे सभासद उपस्थित होते.
संस्था चालवताना विश्वस्त म्हणून संचालकांनी आपुलकीची सेवा दिल्याशिवाय संस्थेचा उत्कर्ष होत नाही याची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी असेही यावेळी जिजाबा पवार यांनी सांगितले.
हणमंत रांजणे यावेळी म्हणाले कुठलीही संस्था चालवताना सध्या अनेक अडचणी आहेत असे असतानाही संस्थेचे अध्यक्ष रविकांत बेलोशे यांनी पांचगणी या पर्यटन स्थळांवर शाखा उघडण्याचा केलेला संकल्प सत्यात उतरवला ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेचे लेखापरीक्षक गणेश पोफळे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले तर तुकाराम घाडगे यांनी आभार मानले.