केबीपी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनकडून सायबर सुरक्षा जनजागृती अभियान – समाजिक उपक्रम.
वर्षे दि.: रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च वर्ये मधील बी.सी.ए विध्यार्थ्यांनी क्विक हिल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने लायन्स इंटरनॅशनल क्लब च्या रिजन २ आयोजित गॅट एलसीआयएफ कॅनक्लेव कार्यक्रमात येथे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी चा समाजिक बांधिलकीचा उपक्रम राबवला गेला.
या मध्ये विद्य्यर्थांनी सायबर सुरक्षाचे महत्त्व तसेच इंटरनेट चा सुरक्षित वापर कसा करावा, ऑनलाईन मध्ये होणारे गुन्हे आणि त्यापासून कशी काळजी घ्यावी याबाबत लायन्स क्लबच्या सोलापूर , सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना उपयुक्त माहिती दिली.