Follow us

Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » स्वर्गीय प्रेमीला कांकीनी दाखवलेल्या वाटेवरती चालण्याचा व सुसंस्कृत पणा जपण्याचा मी आजही प्रयत्न करत आहे -माजी आमदार आनंदराव पाटील

स्वर्गीय प्रेमीला कांकीनी दाखवलेल्या वाटेवरती चालण्याचा व सुसंस्कृत पणा जपण्याचा मी आजही प्रयत्न करत आहे -माजी आमदार आनंदराव पाटील

स्वर्गीय प्रेमीला कांकीनी दाखवलेल्या वाटेवरती चालण्याचा व सुसंस्कृत पणा जपण्याचा मी आजही प्रयत्न करत आहे -माजी आमदार आनंदराव पाटील

तांबवे- माझ्या राजकीय जीवनामध्ये स्वर्गीय प्रेमलाकाकी चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी दिलेला राजकीय आधार व खंबीर साथ मी शेवटच्या श्वासापर्यंत कधीही विसरु शकत नाही.त्यांनी दाखवलेल्या वाटेवरती चालण्याचा व सुसंस्कृत पणा जपण्याचा मी आजही काटेकोरपणे प्रयत्न करत आहे. असे प्रतिपादन माजी विधान परिषद आमदार आनंदराव पाटील यांनी केले. विजयनगर ता कराड येथील प्रेमलाकाकी माध्यमिक विद्यालयात स्वर्गीय. प्रेमलाकाकी चव्हाण ( काकी), आनंदराव चव्हाण आणि रामचंद्र राघोजी पाटील यांचा स्मृतीदिन साजरा करताना ते बोलत होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कराडचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ् डॉ. संजय पवार , द फर्ण हॉटेल चे मालक अक्षय सुर्वे, मलकापूर नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, चंद्रकांत पाटील, शहाजी पाटील, उद्योजक आर. टि. स्वामी, मुंढे गावचे माजी सरपंच आनंदराव जमाले ,अॅड ए. व्हाय.पाटील,मुंढे गावचे माजी सरपंच रमेश लवटे, माजी उपसरपंच विश्वासराव पाटील, सरपंच संजय शिलवंत,दिलीपराव पाटील,विजराव कदम, वसंतराव पाटील, वाठार गावचे जयप्रकाश पाटील, प्रा. हणमंतराव पाटील,हिम्मतराव देसाई, इम्तियाज कागदी,विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एस चव्हाण , उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार आनंदराव पाटील म्हणाले, आजच्या विद्यार्थ्यांनि देखील आपल्या शालेय जीवनामध्ये अशा महान व्यक्तीमहत्वाचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन शिक्षण घेतले पाहिजे व त्यांचे विचार अंगीकृत केले पाहिजेत असे सांगत नानांनी विद्यार्थ्यांना प्रेमलाकाकी विद्यालय मध्ये विविध उपक्रम राबवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कसे प्रेरित केले पाहिजे याचे मार्गदर्शन केले. 

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय पवार यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल, टीव्ही, यापासून अंतर ठेऊन आपल्या भविष्याचा वेध घेण्याचा मुलं मंत्र दिला आज आम्ही कोणत्या परिस्थितीमधून इथंपर्यंत पोहचू शकलो त्यासाठी आम्ही किती अडचणींना सामोरे गेलो व यशस्वी झालो याबदल सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

यावेळी मलकापूरचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव,शहाजी पाटील,प्रा हणमंत कराळे,प्रा विजय कदम यांनी मार्गदर्शन केले.

त्यानंतर इयत्ता 5 मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.तसेच शालेय परिसरा मध्ये वृक्षारोपण केले गेले. तसेच मलकापूर रोटरी क्लब चे अध्यक्ष सलीम भैया मुजावर यांनी शाळेसाठी दिलेल्या पाण्याच्या टाकीचे पूजन देखील यावेळी करण्यात आले. संस्थेच्या वतीने उद्योजक आर. टि स्वामी यांनी आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket