Follow us

Home » राजकारण » लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयास मान्यता

लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयास मान्यता

लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयास मान्यता

पाटण तालुक्यातील पहिलेच कृषी महाविद्यालय

येत्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम प्रवेश सुरू होणार

मुंबई : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यातून पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास नवीन कृषी महाविद्यालय सुरू करण्यास सोमवारी कृषी विभागाकडून मान्यता देण्यात आली. यामुळे पाटण तालुक्यात पहिल्यांदाच कृषी महाविद्यालय सुरू होणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहेत. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानास या नवीन महाविद्यालयास मान्यता मिळाल्याने आदरांजली वाहिली जात आहे, अशी भावना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे. 

पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सहकार क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. कारखाना संस्थेमार्फत कृषी महाविद्यालय सुरू करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री शंभूराज देसाई हे प्रयत्नशील होते. त्याबाबतच्या प्रस्तावास सोमवारी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मान्यता दिल्याने आता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याकडून कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावर नवीन कृषी महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत हे महाविद्यालय असणार असून प्रतिवर्षी ६० विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासूनच महाविद्यालय सुरू होणार असून यामुळे पाटण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणाची संधी तालुक्यातच उपलब्ध होणार आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई हे १९६२-६३ या काळात राज्याचे कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी क्षेत्राविषयी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले होते. त्यांच्या स्मृतींना या नवीन कृषी महाविद्यालयामुळे आदरांजली वाहिली जात असल्याची भावना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे. याबाबत ते म्हणाले की, ‘कसेल त्याची जमीन’ या दृष्टिकोनातून कृषी खात्याचे मंत्री असताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी शेती सुधारणेच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या. शेतीसाठी बडींग योजना, विहीर खोदाई, पाणी उपसण्यासाठी तगाईवर इंजिन देणे, नव्या जातीच्या पिकांचे संशोधन, अन्नधान्ये, कडधान्ये, फळबाग व नगदी पिके वाढवणे, देविराज लांब धाग्याच्या कापसाची योजना इत्यादींमधून त्यांनी शेतकऱ्यांना फायदा करून दिला. कृषी, पशुसंवर्धन पदवीधरांची वेतनश्रेणी वाढवून अभ्यासू व कर्तव्यदक्ष लोक कृषी खात्याकडे वळवण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले होते. तसेच त्यांनी कोल्हापूर येथे कृषी महाविद्यालयाचीही स्थापना केली होती, असे सांगून आता पाटण येथे त्यांच्या नावाने कृषी महाविद्यालय सुरू होत आहे, याचे समाधान असल्याची भावना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. पाटण तालुक्यात हे पहिलेच कृषी महाविद्यालय ठरणार असून यामुळे तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देता आली, याचा आनंद असल्याची भावना व्यक्त करून या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket